प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : राज्य शासनाकडे सातत्याने करण्यात आलेल्या पाठपुराव्यामुळे इचलकरंजी शहरातील अन्न सुरक्षा योजनेतील वंचीत कुटूंबांना जादा कोटा मंजूर केला आहे.त्यामुळे या योजनेच्या लाभापासून वंचीत राहिलेल्या सुमारे साडेतीन हजार कुटुंबांच्या अन्नधान्याचा प्रश्न मार्गी लागला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांनी पञकार बैठकीत बोलताना दिली.
सन २०१३ मध्ये अन्न सुरक्षा योजने अतंर्गत झालेल्या सर्ह्वेक्षणात पात्र ठरलेल्या पण अन्नधान्याच्या लाभापासून अनेक कुटूंब वंचीत राहिले होते. अन्नधान्याचा जादा कोटा शिल्लक नसल्यामुळे त्यांना अन्नधान्य मिळण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे हा कोटा वाढवून मिळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांनी राज्यात महविकास आघाडीचे सरकार प्रस्थापित झाल्यानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे आपल्या पत्राव्दारे मागणी केली होती. तर जलसंपदा मंत्री जयंत पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून कारंडे यांनी सतत पाठपुरावा सुरु ठेवला होता. त्यानतंर १५ डिसेंबर २०२० रोजी अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून याबाबतचा अहवाल देण्याचे निर्देश कोल्हापूर जिल्हाधिका-यांना देण्यात आले होते.या प्रश्नाबाबत कोल्हापूर शासकीय विश्रामगृहात व्यापक बैठक झाली होती.यावेळी इचलकरंजी शहरासाठी स्वतंत्र कोटा वाढवून देण्याबाबतची आग्रही मागणी मदन कारंडे यांनी केली होती. त्यावर सकारात्मक चर्चा होवून जिल्हाधिका-यांनी याबाबतचा अहवाल अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडे २० सप्टेंबर २०२१ रोजी दिला होता. सन २०११ च्या जनगणनेनुसार ३ लाख ३१ हजार ११५ इतका प्राधान्य कोटा कमी पडत होता. त्यामुळे हा कोटा वाढवून मिळावा, अशी मागणी केली होती. त्याला शासन पातळीवरुन हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे.
याबाबत मदन कारंडे यांनी आज पञकार बैठक घेवून याबाबत सविस्तर माहिती देताना सांगितले की ,१८ फेब्रुवारी रोजी शासनाच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून जिल्हानिहाय कोट्यात सुधारणा करण्यात आल्याचा अद्यादेश काढण्यात आला. यामध्ये इचलकरंजी शहराकरीता अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना स्वतंत्र कोटा देण्यात आला. त्यानुसार इचलकरंजी शहरातील या योजनील पात्र ठरलेल्या पण लाभापासून वंचित असलेल्या सुमारे साडे ३ हजार कुटुंबियांचा अन्नधान्याचा आता प्रश्न मार्गी लागला आहे. एकंदरीत , राज्य शासनाने अन्नधान्याचा कोटा वाढवून दिल्याने लवकरच इचलकरंजी शहरासह कोल्हापूर जिल्ह्यातील
संबंधीत लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगून यासाठी मंत्री छगन भुजबळ, जयंत पाटील व हसन मुश्रीफ यांच्यासह जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील जिल्हाधिकारी रेखावार ,राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर, शिवसेना शहराध्यक्ष सयाजी चव्हाणयांचेही मोलाचे सहकार्य मिळाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
या पञकार बैठकीस शिवसेना शहरप्रमुख सयाजी चव्हाण ,माजी पाणी पुरवठा सभापती विठ्ठल चोपडे ,अमित गाताडे आदी उपस्थित होते.