ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. डॉ. अशोक चौसाळकर..
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता. ९ युक्रेनची अस्तित्व सिद्ध करण्याची ऊर्मी व रशियाची धडा शिकवण्याची खुमखुमी आणि जागतिक अर्थकारणातील बड्यांचा बेजबाबदारपणा यातून रशिया व यूक्रेन युद्ध सुरू झाले.हे युद्ध हे फार दिवस चालणार नाही. तसेच त्यामुळे अणूयुद्धाची शक्यताही नाही.मात्र यामुळे जागतिक शांततेला धोका निर्माण झाला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेवरही त्याचा गंभीर परिणाम होणार आहे. खुद्द रशियन अर्थव्यवस्था आहे वीस - पंचवीस वर्षे मागे पडण्याची शक्यता आहे, असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांनी व्यक्त केले. ते समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने आयोजित व्याख्यानात ' रशिया युक्रेन युद्ध ' या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. जे.एफ. पाटील होते.प्रसाद कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
8 मार्च महिला दिना निमित्त पुढ़ारी वितरणचे श्री.शिवाजी पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी वृत्तपत्र विक्र्रेत्या संगीता मुरलीधर भोसले यांचा गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या .
डॉ. अशोक चौसाळकर म्हणाले ,मुळात गुप्तहेर यंत्रणेचे अधिकारी असलेल्या पुतीन यांची अध्यक्षपदी निवड तत्कालीन अध्यक्ष येलस्टीन यांनी केली. पाताळयंत्री व सत्तालोभी असलेल्या पुतिन यांनी घटनेची मोडतोड करून हातातील सत्ता अबाधित राखली व ती तहहयात ठेवणार आहेत. हे युद्ध लांबत जाईल तितक्या समस्या वाढत जाणार आहेत.युक्रेनचे अफगानिस्तान करण्याचा मनसुबा दिसत आहे.रशिया ही जगातील दुसरी लष्करी ताकद आहे.भारत सत्तर टक्क्याहून अधिक संरक्षण व साधने रशियातून आयात करत असतो.त्यामुळे भारताला रशियाच्या विरोधी जाता येणे शक्य नाही. म्हणून प्राप्त परिस्थितीत घेतलेली भूमिका अपरिहार्य होती. डॉ.चौसाळकर यांनी आपल्या भाषणात या विषयाचे नाटो व भारत यासह राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध राजकीय वा आर्थिक पैलू सविस्तरपणे मांडले. तसेच प्रश्न - शंका यांचे निर्सनही केले.प्रा. डॉ.जे.एफ.पाटील यांनी अध्यक्षीय मनोगतातून कोणतेही युद्ध हे आर्थिक खाईत लोटणारे व विकासाची आहुती देणारे असते.त्यामुळे शांतता हाच विचार महत्वाचा ठरतो.अन्वर पटेल यांनी आभार मानले.