प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी / प्रतिनिधी
बॉडी बिल्डींग खेळाला अधिक प्रोत्साहन मिळण्याच्या उद्देशाने इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डींग अॅण्ड फिटनेसच्या मान्यतेनं इंडियन बॉलीबिल्डींग - फिटनेस फेडरेशनच्या वतीने 15 ते 17 एप्रिल या कालावधीत पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलातआंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डींग स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती इंडियन बॉलीबिल्डींग आणि फिटनेस फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी संजय मोरे यांनी इचलकरंजी येथे पत्रकार बैठकीत बोलताना दिली.
गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारी व लाॅकडाऊनच्या परिस्थितीमुळे शासनाने विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यावर कडक निर्बंध घातले होते.त्यामुळे खेळाडूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.पण ,आता शासनाने सर्व स्पर्धा आयोजनावरील कडक निर्बंध उठवून खेळाडूंना मोठा दिलासा दिला आहे.
याच अनुषंगाने इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डींग अॅण्ड फिटनेसच्या मान्यतेने आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डींग चॅम्पियनशिप महिला-पुरुष आणि फिटनेस फेस्टिव्हलचे 15 ते 17 एप्रिल या कालावधीत पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डींग स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहितीइंडियन बॉलीबिल्डींग आणि फिटनेस फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी संजय मोरे यांनी पत्रकार बैठकीत बोलताना दिली.तसेचआतापर्यंतचा स्पर्धा आयोजनाचा अनुभव पाहून आंतरराष्ट्रीय संघटनेने इंडियन बॉलीबिल्डींग आणि फिटनेस फेडरेशनला स्पर्धा आयोजनाचा मान दिला आहे. यातून देशातील खेळाडुंना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. मग स्पर्धेत विविध 11 गटात स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेच्या ठिकाणी 10 हजार प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे. 100 हून अधिक देशातील 2 हजारहूनअधिक खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतील, असा विश्वास देखील संजय मोरे यांनी व्यक्त केला. यावेळी मार्गदर्शक
रामकृष्ण चितळे, प्रशिक्षक विजय मोरे, राहुल परीट, अंजिक्य रेडेकर, दुर्गाप्रसाद दासरी, ओम सातपुते आदी उपस्थित होते.