शहरास काही दिवस अपुरा पाणी पुरवठा होणार आहे.
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी शहरास कृष्णा आणि पंचगंगा नदीतून पाणी पुरवठा करणेत येतो. या मधील पंचगंगा नदीमध्ये मृत झालेल्या माशांमुळे नदीच्या पाण्यास मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असुन नदीतील पाणी सुद्धा काळपट झालेले आहे. त्या मुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून नगरपरिषदे कडुन पंचगंगा नदीतुन करणेत येत असलेला पाणी उपसा आज पासून तात्पुरता बंद करणेत आलेला आहे. नगरपरिषदे कडून पुढील काही दिवस फक्त कृष्णा पाणी पुरवठा, मजरेवाडी योजनेतूनच पाणी उपसा होणार असलेने शहरास काही दिवस अपुरा पाणी पुरवठा होणार आहे.
तरी शहरातील नागरिकांनी आपल्या कडील पाणी जपुन आणि काळजीपूर्वक वापरुन सहकार्य करावे असे आवाहन नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्य अधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या कडून करणेत येत आहे.