प्रेस मीडिया लाईव्ह :
विनोद कोडापे. जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
📱8380802959📱
शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना. वर्षभरात विविध चकमकीत माओवाद्यांचा झालेल्या खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यासह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मसमर्पण केले आहे. त्याच बरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलिस दलाने पुनर्वसन घडऊन आणल्यामुळे माओवादी मोठ्या संख्येने आत्मसमर्पण करीत आहेत.
नुकतेच 20 लाख रुपये बक्षीस असलेले नक्षलवादी नामे दीपक उर्फ मुंशी रामसू इश्टाम वय 34 वर्ष रा. गडेरी, पोमके कोटमी ता. एटापल्ली जि. गडचिरोली व शामबत्ती नेवरू आलम वय 25 वर्ष रा. हिदावडा पोष्ट अाेरचा जी. नारायणपूर (छ. ग.) यांनी मा. पोलिस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा. यांच्या समोर आत्मसमर्पण केले.
दिपक इष्टाम व शामबत्ती आलाम हे दोघे पती पत्नी असून ते दोघेही प्लाटून क्र.21 मध्ये कार्यरत होते. दिपक इष्टाम हा डीव्हीसी पदावर तर शामबत्ती आलाम ही प्लाटून सद्यस म्हणून कार्यरत होते. दिपक ईश्टाम यांचेवर खुनाचे 03, चकमकीचे 08, जाडपोड 02 असे गुन्हे दाखल असून, माहे जुलै 2001 मध्ये तो कसनसुर दलम सद्यस पदावर भरती झाला होता. त्यानंतर माहे ऑक्टोबर 2001 ते नोव्हेंबर 2002 तो चामोर्शी दलम सद्यस पदावर कार्यरत होता. त्यानंतर माहे ऑक्टोबर 2004 पर्यंत तो सिसिएफ देवाजी यांचे प्रोटेक्शन गार्ड मध्ये कार्यरत होता. नंतर सन 2006 पर्यंत कंपनी क्र.01 मध्ये ए सेक्शन मध्ये उपकमांडर पदावर कार्यरत होता. त्यानंतर 2009 ते 2015 पर्यंत कंपनी क्र.01 ए प्लाटून कमांडर पदावर व त्यानंतर सन 2015 ते आजपर्यंत प्लाटून क्र.21 मध्ये डीव्हीसी पदावर कार्यरत होता. नक्षल मध्ये कार्यरत असताना त्याने विविध ठिकाणी 06 एम्बुष लावले होते. त्याने लावलेल्या एम्बूष मध्ये छत्तीसगडमधील कुदूरघाटी 04, झाराघाटी 02, कोंगेरा 25 असे एकूण 31 जवान शहीद झाले. पत्नी शामबत्ती हीचेवर चकमकीचे 02 असे गुन्हे दाखल असून, ती सन 2015 मध्ये 08 महिने जनमिलिशिया मध्ये व त्यानंतर प्लाटून क्र.16 मध्ये सद्यस पदावर भरती होऊन आजपर्यंत प्लाटून क्र.21 मध्ये कार्यरत होती.
शासनाने दिपक ईश्टाम यांचेवर 16 लाख रुपयाचे तर शामबत्ती आलाम हिचेवर 04 लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. त्यांनी आत्मसमर्पण केल्यामुळे पुनर्वसन करिता शासनाकडून दिपक ईश्टाम यास 06 लाख रुपये व शामबत्ती आलाम हिला 2.5 लाख रुपये तसेच पती पत्नी एकत्रीत आत्मसमर्पण केल्यामुळे अतिरिक्त 1.5 लाख असे एकूण 10 लाख रुपये तसेच शासनाच्या इतर योजनेचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे.
गडचिरोली पोलिस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे सन 2019 ते 2022 वर्षामध्ये आतापर्यंत एकूण 45 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यामध्ये 5 डीव्हीसी,02 दलम कमांडर,03 उपकमंडर,34 सद्यस व 01 जनामिलिशिया यांचा समावेश आहे.
सदर नक्षलीचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई गडचिरोली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मा. श्री. अंकित गोयल , मा अप्पर पोलिस अधीक्षक (अभियान) श्री सोयम मुंडे, मा. अप्पर पोलिस अधीक्षक (प्रशासन) श्री समीर शेख, मा अप्पर पोलिस अधीक्षक अहेरी श्री. अनुज तारे, यांचे मार्गदर्शनाखाली विशेष अभियन पथकाने सपोनी बाबासाहेब दुधाळ यांनी पार पाडून मोठी भूमिका बजावली आहे. टी सी ओ सी सप्ताहाच्या पारश्वभूमीवर 02 जहाल नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केल्याने नक्षली हालचालींवर अंकुश ठेवण्यात गडचिरोली पोलिस दलास मोठे यश प्राप्त झाले. आहे.