बेडकिहाळ येथे ग्राम वन नागरीक सेवा केंद्राचे उद्घाटन

  निपाणी तहसीलदार मोहण भस्मे यांच्या हस्ते दिमाखात करण्यात आले.

प्रेस मीडिया लाईव्ह :

बेडकिहाळ :    येथील युवा सामाजिक कार्यकर्ते डॉ विक्रम शिंगाडे यांच्या विशेष प्रयत्नाने बेडकिहाळ येथील बाजारपेठ शिवाजी चौक परिसरात "ग्राम वन  नागरिक सेवा केंद्र" अंतर्गत गांव एक सेवा अनेक " सर्व सामान्य नागरिकांना     सरकारी सर्व सेवा सुविधा एकाच ठिकाणी उपलब्द्ध व्हाव्यात  म्हणून  " ग्राम वन सेवा केंद्राचे उद्घाटन शुक्रवार (ता ४) राजी निपाणीचे तहसिलदार मोहन भस्मे यांच्या हस्ते करण्यात आले. 



 स्नेहा जाधव हिच्या  प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली.   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत अध्यक्षा सौ.विध्या देसाई ह्या होत्या.  तर व्यास पिठावर  महसूल उप निरिक्षक एस एन नेमन्नवर, ग्राम विकास अधिकारी बेडकिहाळ ए एस झेंडे उपाध्यक्षा जयश्री जाधव,, कृषिपंडित सुरेश देसाई, माजी अध्यक्षा सौ.मेघा मोहिते,माजी उपाध्यक्षा   सौ. स्वाती कांबळे, निवृत्त प्रा. डी एन दाभाडे, शंकर पाटील उपस्थितीत होते.   

 विक्रम शिंगाडे यांनी उपस्तीतांचे स्वागत केले, व प्रस्थाविकात  ग्राम वन सेवा केंद्रात नागरिकांना सरकारी योजना सह  इतर कोण कोणत्या सेवा मिळतात या विषयी सांगितले. या वेळी शिंगाडे यांच्या वतीने  उपस्थित सर्व  मान्यवरांचा सत्कार   करण्यात आला. तर तहसीलदार भस्मे  यांच्या सह  महसूल उपनिरीक्षक संजय नेमन्नवर, प्रा डि एन दाभाडे, व अध्यक्षा विध्या देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. व  ग्राम वन सेवा केंद्रा मुळे गांवातील सर्व सामान्य नागरिकांना आधार कार्ड, काढणे, दुरुस्त करणे, रेशनकार्ड करणे, अपंग, विधवा, वयोवृद्ध पेनशेंन, व ई श्रम कार्ड, शेती विषयक कागदपत्रे,  सरकारच्या सर्व इतर उपयुक्त सुविधांचा लाभ मिळण्या साठी हे सेवा केंद्र उपयोगात येणार आहे, तरी याचा सर्व नागरिकांनी लाभ करून घ्यावा. असे आवाहन केले.

    या प्रसंगी माजी ग्राम पंचायत अध्यक्ष शंकर पाटील, संजय देसाई, राजु पाटील डॉ विक्रम शिंगाडे, ग्राम पंचायत सदस्य  संजय पाटील, सुरेष देसाई, निवृत्त प्रा दाभाडे, जीवन यादव, शिरीष कांबळे, रुपेश सनदी, प्रशांत कांबळे, शिलवंत यादव अशोक यादव, होते. नागरिकांनी बेडकिहाळ येथेच उप महसूल कार्यालय लवकरात लवकर कार्यत व्हावे अशी मागणी तहसिलदार भस्मे यांच्या कडे केली.

  या प्रसंगी तालुका पंचयात सदस्य चांद मुल्ला, ग्राम पंचायत सदस्य जीवन यादव, संजय देसाई, वसंत बाबर, शीतल खोत, सौ. दीपा जाधव, प्रा.वाजंत्री सर,  विलास घोडके, कृष्णात घोडके, महेश कांबळे, यांच्या सह इतर नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. प्रीती हट्टीमनि यांनी केले तर  सेवा केंद्राचे प्रमुख पंकज कांबळे यांनी आभार  मानले.

बेडकिहाळ,   ग्राम वन नागरी सेवा केंद्राच्या उदघाटना प्रसंगी तहसीलदार मोहन भस्मे, एस एन नेमन्नवर, शंकर पाटील,विद्या देसाई, मेघा मोहिते, स्वाती कांबळे, जयश्री जाधव, विक्रम शिंगाडे, संजय देसाई, व इतर, उपस्थित होते.  या ग्राम वन विकास केंद्राचे अपरेटर पंकज कांबळे हे या सर्व सरकारच्या योजना कार्यालयांमध्ये उपलब्ध करून  देतील. याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा.

Post a Comment

Previous Post Next Post