प्रेस मीडिया लाईव्ह :
बारामती प्रतिनिधी : धनराज जगताप :-
बारामती तालुक्यातील बऱ्हाणपूर भेपळबेट रस्ता ते बऱ्हाणपूर अंजनगाव येथील रस्त्याचे खडीकरण मुरुमीकरण चे काम सध्या सुरू आहे हे काम ग्रामपंचायत बऱ्हाणपूर नेपतवळन यांच्या अंतर्गत सुरू आहे . सदर काम हे ग्रामपंचायत चे सरपंच व उपसरपंच हे या कामाचे ठेकेदार आहेत आपल्या गावातील विकासाच्या दृष्टीने सरपंच उपसरपंच यांनी कामाची मंजुरी घेत पुढाकार घेऊन हे काम हाती घेतले आहे.परंतु काही कामात थोडीशी तृटी आढळून आल्यामुळे सदर झालेले काम चुकीचे सुरू असल्याचे अंजनगाव येथील गावकऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर सदर कामाची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषदबांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता उपविभागीय अधिकारी श्री निलेश जरांडे यांना गावातील ग्रामस्थांनी फोन वरून तक्रार केली होती.
आपले कर्तव्य लक्षात घेऊन बांधकाम विभागाचे अधिकारी तत्काळ महाशिवरात्री च्या सुट्टीच्या दिवशी देखील निलेश जरांडे साहेब यांनी सुरू असलेल्या रस्त्याचे पाहणी करत ठेकेदारान खडे बोल सुनावले या वेळी ठेकेदार यांना मुरुम हा चांगल्या प्रतिचा वापरून त्यावर चांगल्या प्रकारे रोलिंग करण्यासाठी आदेश दिले तसेच काम हे इस्टिमेंट प्रमाणेच करण्यासंदर्भात आदेश दिले.सदर रस्ता हा मुरुम खडी करण असल्याने तो दर्जेदार झाला पाहिजे खेड्यातील शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त असा हा रस्ता आहे. बारामती तालुक्यातील विकासाच्या दृष्टीने हलगर्जीपणा नको असे मत या वेळी बांधकाम विभागाचे निलेश जरांडे यांनी व्यक्त केले.
परिसरातील नागरिकांनी जरांडे साहेब यांचे कोडकौतुक केले या वेळी ग्रामस्थांनी असा प्रामाणिक व कर्तव्येदक्ष अधिकारी परत होने नाही असे अधिकारी जर सर्व सरकारी कार्यालयात लाभले तर नक्कीच तालुक्यातील ग्रामीण भागातील विकास झाल्याशिवाय राहणार नाही असे मत अंजनगाव येथील ग्रामस्थांनी मत व्यक्त केले.