लेटेस्ट न्यूज : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या मातोश्री जकीया जलील (वय ८२) यांचे निधन



प्रेस मीडिया लाईव्ह :

अलविना शकील कुरेशी : 

 
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या मातोश्री जकीया जलील (वय ८२) यांचे दिर्घ आजाराने खासगी रूग्णालयात सोमवारी ७ मार्च रोजी सायंकाळी निधन झाले.  गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.आपल्या परिसरातील लहान मुलांच्या शिक्षणासाठी त्या काम करत होत्या.  अरेबी शिक्षणासाठी देखील त्यांनी पुढाकार घेतला होता.  मेंदूच्या विकारामुळे काही दिवसांपुर्वी त्यांना खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते



आईची प्रकृती बिघडल्याचे कळताच इम्तियाज जलील हे उत्तर प्रदेशातील प्रचार सोडून औरंगाबादेत परतले होते. जकीया जलील यांचा दफनविधी हुजूर शहा मियॉ दर्गा परिसरातील कब्रस्तानात होणार आहे. त्यांच्या पश्चात बहरिन येथे कार्यरत असलेले जफर जलील, खासदार इम्तियाज जलील आणि जेट एअरवेजचे माजी व्यवस्थापक अहेमद जलील ही तीन मुले यांच्यासह चार मुलीं, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post