त्यांचा दिलेर पनाही ही दिसला नाही आणि मैदानी पणा ही दिसला नाही..... प्रकाश आंबेडकर.
प्रेस मीडिया लाईव्ह :
अकोला: फोन टॅपिंग प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना सायबर पोलिसांनी नोटीस दिल्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे, तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे राजकारण म्हणजे गांडूचे राजकारण असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते अकोल्यात बोलत होते. आंबेडकर म्हणाले मी देवेंद्र फडणवीस यांना मैदानी दिलेर समजत होतो. पंरतु, त्यांचा दिलेर पनाही ही दिसला नाही आणि मैदानी पणा ही दिसला नाही. त्यांनी जी टेप स्पीकरला दिली, सभागृहात दिली. याला सामान्य माणसाच्या भाषेत म्हणायचे असेल तर गांडूचे राजकरण केले अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. दिलेर पणाचे राजकारण जर करायचे असेल तर त्यांनी ती टीप लोकांसमोर जाहीर केली पाहिजे होती , तसेच फडणवीस यांनी ती टेप लोकांसमोर दिली असती तर पोलिसांनी नोटीस दिली नसती असेही आंबेडकर म्हणाले.