पिंपरी-चिंचवड : महापालिका व ठेकेदाराकडून साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पिळवणूक

 त्या विरोधात संतप्त होत सफाई कर्मचाऱ्यांनी महापालिकेवर आंदोलन छेडले.


प्रेस मीडिया ऑनलाइन :

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस : 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व ठेकेदाराकडून साफ सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पिळवणूक केली जात आहे. या बाबत सातत्याने निवेदन देऊनही दुर्लक्ष करण्यात आले. त्या विरोधात संतप्त होत सफाई कर्मचाऱ्यांनी महापालिकेवर आंदोलन छेडले.या वेळी ठेकेदार, महानगरपालिकेच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.

कष्टकरी जनता आघाडीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी कष्टकरी कामगार पंचायत कार्याध्यक्ष बळीराम काकडे , सफाई कामगार संघटनेच्या नेत्या मधुरा डांगे, कष्टकरी जनता महीला आघाडीच्या मलानताई गवई, गौरी प्रमोद सेलर,हे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post