निगडी येथील परिमंडळ कार्यालयास आमदार अण्णा बनसोडे यांची भेट,

 दिनेश नामदेव तावरे परिमंडळ अधिकारी निगडी यांच्या कार्यपद्धतीवर स्थानिक आमदार अण्णा बनसोडे यांनी समाधान व्यक्त केले.


प्रेस मीडिया लाईव्ह

पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली शेख :

पिंपरी-चिंचवड निगडी येथील परिमंडळ कार्यालयांतर्गत राशन कार्ड कार्यालय मधील कामकाज पद्धतीची पाहणी करण्यासाठी निगडी येथील परिमंडळ कार्यालयास आमदार अण्णा बनसोडे यांनी भेट देऊन कार्यालयाची पाहणी करून स्थानिक आमदार अण्णा बनसोडे यांनी या बाबत समाधान व्यक्त केले.

सर्व सामान्य जनतेला शिधापत्रिकेच्या कामकाजामध्ये पारदर्शकता व सर्व मुलभुत सुविधा नागरीकांना मिळण्याकरिता  डॉ . राजेश देशमुख , जिल्हाधिकारी , पुणे व  डॉ . त्रिगुण कुलकणी , उपआयुक्त ( पुरवठा )  पुणे , विभाग पुणे यांनी संपुर्ण विभागातील पुरवठा शाखेला ( आय.एस.ओ. ९००१-२०१५ ) मानांकन मिळण्यासाठी वेळोवेळी बैठकी घेऊन सर्व अधिकारी / कर्मचारी यांना सूचना व मार्गदर्शन केलेले आहे , त्यानुसार सचिन ढोले , अन्नधान्य वितरण अधिकारी पुणे यांनी सुध्दा वेळोवळी बैठका घेऊन मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या आहेत . अन्नधान्य वितरण कार्यालय पुणे अंतर्गत परिमंडळ कार्यालय अ व ज विभाग निगडी , पिंपरी चिंचवड शिधापत्रिका कार्यालय संत तुकाराम व्यापार संकुल पहिला मजला , निगडी पुणे ४४ येथे कार्यरत आहे . सदरचे कार्यालयात ( आय.एस.ओ. ९००१- २०१५ ) चे मानांकन प्राप्त करणे करीता कामकाज युध्द पातळीवर सुरु आहे . *या मध्ये सर्व सामान्य नागरीकांसाठी बैठक व्यवस्था , पिण्याचे पाणी , सुलभ शैचालय , तक्रारपेटी , प्रथमोपचार , दिव्यांग व वयोवृध्द नागरीकां करीता विशेष बैठक व्यवस्था , शिधापत्रिका अर्जदार यांना त्यांचे अर्ज भरणे करीता विशेष व्यवस्था करणेत आली आहे , तसेच शिधापत्रिका संबंधित सर्व अद्यावत माहिती फलक लावणेत आले आहे , ऑनलाईन रेशनकार्ड तपासणी करीता विशेष एक खिडकी योजना चालु करणेत आली आहे . तसेच सर्व सामान्य नागरीकांकरीता तक्रार नोंदवही , अभिप्राय नोंदवही , कार्यालयीन भेट पुस्तिका ठेवणेत आले आहे . तसेच नागरीकां करीता बँके प्रमाणे टोकन पध्दतीने शिधापत्रिकेचे कामकाज करणेत येत आहे.* यामध्ये नागरीकां मध्ये शिस्त निर्माण होवुन शासकीय कामाच्या वेळेची सुध्दा बचत होत आहे . तसेच कार्यालयाचे नुतनीकरण व अभिलेखाचे अद्यावतीकरण सुध्दा करणेत आले आहे . स्थानिक आमदार यांनी सदर कामकाजाची पाहणी केली. सदर पाहणीच्या दरम्यान परिमंडळ कार्यालयाचे ( आय.एस.ओ. ९००१ २०१५ ) चे मानांकनाचे कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे . दिनांक २१/०२/२०२२ रोजी परिमंडळ कार्यालय ज विभाग पिंपरी यांची दक्षता समिती सदस्य विभागाची बैठक आयोजित केली  होती .

 सदर बैठकीस . अण्णा बनसोडे आमदार  , पिंपरी विधानसभा तथा दक्षता समिती अध्यक्ष , ज परिमंडळ विभाग , पिंपरी व इतर दक्षता समिती सदस्य उपस्थित होते .  आमदार साहेब व सर्व सदस्यांनी सुध्दा ( आय.एस.ओ. ९००१-२०१५ ) चे मानांकनाचे कार्यालयाची पाहणी करून त्यांनी कार्यालय व कार्यालयाच्या कामकाजा बाबत समाधान व्यक्त केले आहे .


प्रेस मीडिया लाईव्ह

पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली शेख

Post a Comment

Previous Post Next Post