सुदैवाने ओवैसी यांना कोणतीही इजा झालेली नाही.
प्रेस मीडिया ऑनलाइन :
सुनील पाटील :
दोन लोकांनी त्यांच्या ताफ्यावर गोळ्या झाडल्या. फायरींगमध्ये गाडीचं टायर पंक्चर झाल्याची माहिती आहे. सुदैवाने ओवैसी यांना कोणतीही इजा झालेली नाही.
विधानसबा निवडणुकीनिमित्ताने ओवैसी उत्तर प्रदेशमध्ये होते. आज प्रचारानंतर ते मेरठवरुन दिल्लीला परतत असताना त्यांच्या ताफ्यावर अचानक दोन लोकांना गोळीबार केला. एकूण चार राऊंड फायर करण्यात आले.
मेरठ इथली प्रचारसभा आटपून परतत असताना टोलनाक्यावर गोळीबार झाल्याची माहिती स्वत: ओवैसी यांनी दिली आहे. छिजारसी टोल नाक्यावर आपल्या गाड्यांवर गोळीबार झाला, ४ राऊंड फायर झाले, ३ ते ४ लोक होते, शस्त्र तिथेच टाकून हल्लेखोर पळून गेले. माझी गाजी पंक्चर झाली, मी दुसऱ्या गाडीत बसून तिथून निघालो, मी सुरक्षित आहे, असं ट्विट ओवैसी यांनी केलं आहे.