मजरेवाडी येथील ३५० एकर जमीन सुधारणा कामाचा शुभारंभ
प्रेस मीडिया लाईव्ह :
शिरोळ (प्रतिनिधी) :
क्षारपड जमीन क्षारमुक्त करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जाणीव आणि जागृती निर्माण झाली आहे. मजरेवाडी येथील शेतकरी एकत्र येऊन नापीक जमीन पिकाखाली आणण्यासाठी पुढे आले आहेत हे कौतुकास्पद आहे. शासनाकडून अनुदान मिळेल की नाही याचा विचार न करता शेतकऱ्यांनी संस्था स्थापन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी. शेतकऱ्यांची सर्वांगीण प्रगती करण्यासाठी आणि त्यांचे हित जोपासण्यासाठी दत्त कारखाना आणि दत्त उद्योग समूह लागेल ती मदत करेल, अशी ग्वाही श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी दिली.
मजरेवाडी आणि परिसरातील क्षारपड जमीन सुधारण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असे आवाहनही त्यांनी केले. मजरेवाडी येथील ३५० एकर जमीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत सर्व्हे कामाचा शुभारंभ श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.
गणपतराव पाटील यांच्या क्षारमुक्तीच्या कामाची दखल राष्ट्रीय पातळीवर 'दत्त पॅटर्न' म्हणून घेतली गेली असून शेतकरी एकत्र येऊन क्षारमुक्तीचे काम करीत आहेत ही समाधानाची गोष्ट आहे. या कामाला दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी संपूर्ण पाठबळ आणि सहकार्य दिले आहे. त्यामुळे हा प्रकल्प निश्चितच यशस्वी होणार आहे असा विश्वास यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर गणपतराव पाटील यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी कॉन्टॅक्टर कीर्तीवर्धन मरजे, सुदर्शन तकडे, बापू खराडे, महावीर पट्टणकुडे, भूपाल बुबनाळे, पायगोंडा पाटील, शिरीष कागले, रविंद्र नरुटे, आप्पासाहेब नरुटे, बुद्धिराम पाटील, बाळासो जुगळे, मारुती कोकणे, पोपट मडिवाळ, सुहास पट्टणकुडे, महेश बुबनाळे, सतीश कागले, मल्लय्या मठपती, अशोक चव्हाण, सुकुमार खुरपे, भैय्या नरुटे, योगेश चव्हाण, धोंडीराम साबळे, जनार्दन मांजरे, जयपाल मडिवाळ, अमोल मडिवाळ, अमोल पट्टणकुडे, अजित कागले, जनार्दन नरुटे, वसंत नरुटे, संतोष चव्हाण, किशोर जुगळे, भालचंद्र खुरपे, जयपाल खेमाणे, नितीन खेमाणे, महादेव चव्हाण, अनिल मडिवाळ, सम्मेद खेमाणे, आनंदा परीट, आनंदा बदामे, पिंटू आरबाळे यांच्यासह शेतकरी, मान्यवर उपस्थित होते.