प्रेस मीडिया ऑनलाईन :
रायगड जिल्हा प्रतिनिधी : सुनील पाटील :
भारतीय जनता पार्टीचे पनवेल शहर खजिनदार संजय मोतीलाल जैन यांच्या मोतोश्री सरस्वतीदेवी मोतीलाल जैन यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी (रविवार, दि. ०६) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर तक्का येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेस सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, व्यापारी वर्गातील मान्यवर उपस्थित होते.
सरस्वतीदेवी यांच्या पश्चात पती, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सरस्वतीदेवी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बुधवार दिनांक ०९ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता पनवेल शहरातील विरुपाक्ष मंगल कार्यालयाच्या सभागृहात शोकसभा आयोजित करण्यात आली आहे.