कनकवलीतील धक्कादायक घटना.
प्रेस मीडिया ऑनलाइन
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
शाळेतील विदयार्थी चे केस नखे तसेच गणवेश यौवस्थित आहे की नाही हे शिक्षक का कडून तपासण्यात येत असते केस किंवा नखे वाढली असतील तर विद्यार्थ्यांना समज देऊन कापण्याचे सांगण्यात येते. पण कणकवलीतील एका विद्यार्थ्याला शिक्षकाकडून बेदम मारहाण केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या मुलाच्या गालावर हाताच्या थापटाने मारले आणि केसाला धरून डोके आपटले असल्याची तक्रार त्याच्या पालकांनी केली आहे. कणकवलीतील या घटनेने खळबळ उडाली आहे.
मारहाणीत विद्यार्थ्याचा गाल काळा-निळा कणकवलीतील एका इंग्रजी मीडियममध्ये पीडित विद्यार्थी इयत्ता पाचवीत शिकतो. शाळेतील शिक्षकाने या मुलाच्या गालावर हाताच्या थापटाने मारले आणि केसाला धरून डोके आपटले अशी तक्रार संबंधित मुलाच्या वडिलांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. या मारहाणीत 5 वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या गालावर मारहाणीचे व्रण दिसत असून त्याचा उजवा गाल काळा निळा पडला आहे. वाचा : ओवैसींच्या गाडीवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोऱ्यांचे फोटो, सांगितलं हल्ल्याचं कारण शाळेने आरोप फेटाळले तर याबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका आणि संबंधित शिक्षक यांच्याकडे आमच्या प्रतिनिधीने चौकशी केली असता या विद्यार्थ्याला शाळेत मारहाण झालीच नाही असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान विद्यार्थ्याच्या वडिलांनी अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराविरोधात असलेल्या नॅशनल हेल्पलाईन 1098 या चाईल्ड लाईनवर संपर्क साधून आपबिती सांगितली. त्यामुळे चाईल्ड लाईनच्या पदाधिकाऱ्यांनी कणकवलीत दाखल होत त्यांच्या घरी जात मारहाण झालेला विद्यार्थ्याची विचारपूस केली. तसेच घडलेल्या प्रकाराची माहिती विद्यार्थी आणि त्याच्या पालकांकडून घेतली. तसेच हा विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेमध्येही जात मुख्याध्यापक तसेच संबंधित शिक्षकांकडे याबाबत चौकशी केली.