कर्जत तालुक्यातील पत्रकारांच्या एकजुटीनंतर पोलिसात गुन्हा दाखल
प्रेस मीडिया ऑनलाईन :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
दैनिक सागर आणि महाराष्ठ्र 24 लाईव्ह,रायगड माझा यूट्यूब पोर्टलचे प्रतिनिधी पत्रकार अजय गायकवाड यांना आज 15 फेब्रुवारी रोजी सकाळी त्यांच्या राहत्या घराजवळ जाऊन मारहाण करण्यात आली.नेरळ ग्रामपंचायतच्या एका सार्वजनिक शौचालय हटविण्यावरून स्थानिक आदिवासी लोकांनी पत्रकारांकडे न्यायाची मागणी केली होती. प्रकरणावरून स्थानिकांच्या बाजूने आवाज उठविणारे पत्रकार अजय गायकवाड यांना नेरळमधील स्थानिक असलेल्या एका सरकारी नोकर मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. दरम्यान,कर्जत तालुक्यातील पत्रकारांनी एकजुटीने प्रसंगाला सामोरे जाऊन नेरळ पोलीस ठाणे गाठले असता दुपारी नेरळ पोलिसांनी महाराष्ट्र शासनाच्या प्रसार मध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था यांचे नुकसान हिंसा आणि मालमतेचे नुकसान अधिनियम 2017च्या कलम 4 नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
नेरळ ग्रामपंचायत मधील वाल्मिकी नगर येथील सार्वजनिक शौचालय 9 फेब्रुवारी रोजी तोडल्याने आल्याबद्दल स्थानिक आदिवासी लोकांची गैरसोय होत होती.त्याबद्दल स्थानिकांनी आदिवासी लोकांनी पत्रकार अजय गायकवाड यांच्याकडे आपली कैफियत मांडली होती.त्यानंतर अजय गायकवाड यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली आणि स्थानिक महिलांशी बोलून माहिती घेतली.स्थानिक महिलांनी पत्रकार यांच्याकडे दाद मागितल्यानंतर नेरळ ग्रामपंचायतने तेथे पुन्हा सार्वजनिक शौचालय बांधून देण्याचे आश्वासन दिले आहे.त्यामुळे ते सार्वजनिक शौचालय तोडण्यात यावे यासाठी अर्ज करणारे तरुण मॉन्टी कदम यांनी सार्वजनिक शौचालय प्रकरणी स्थानिक आदिवासी लोकांना साथ देणारे पत्रकार अजय गायकवाड यांना गाठण्यासाठी आज 15 फेब्रुवारी रोजी गायकवाड राहत असलेल्या हेटकर आळी भागातील घराच्या बाहेर दबा धरून थांबले होते. सकाळी पावणे आठ वाजता घराच्या बाहेर गाठून मॉन्टी कदम यांनी अजय गायकवाड यांना शिवीगाळ करीत आपण एका जातीचे आहोत,त्या आदिवासी लोकांच्या नादी काय लागतो असे बोलून गायकवाड यांच्या अंगावरील कपड्यांना धरून धक्काबुक्की करीत ढकलून दिले.त्याचवेळी तेथे कदम यांनी गायकवाड यांना रस्त्यावर ढकलून देत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
या घटनेची माहिती मिळताच कर्जत तालुक्यातील सर्व पत्रकार सकाळी 9 वाजता नेरळ येथे जमले आणि त्यांनी पोलीस ठाणे गाठले.पत्रकार अजय गायकवाड यांच्या हल्ला करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची कर्जत प्रेस क्लबची मागणी लेखी निवेदन देऊन केली आहे.सध्या त्याबाबत कार्यवाही सुरू असून कर्जत तालुक्यातील सर्व पत्रकार अजय गायकवाड यांच्या समर्थनार्थ नेरळ पोलीस ठाण्यात हजर आहे.नेरळ येथील पत्रकार अजय गायकवाड यांना मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी कर्जत प्रेस क्लबच्या संघटनेने केली आहे.यावेळी नेरळ पोलीस ठाण्यात जेष्ठ पत्रकार विजय मांडे , रायगड प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष संतोष पेरणे,माजी संघटक संजय मोहिते, माजी उपाध्यक्ष धर्मानंद गायकवाड,जिल्हा खजिनदार दर्वेश पालकर,कर्जत प्रेस क्लब अध्यक्ष राहुल देशमुख,उपाध्यक्ष विलास श्रीखंडे,सचिव ज्योती जाधव, खजिनदार मल्हार पवार,संजय अभंगे दीपक पाटील,कांता हाबळे,गणेश पवार, गणेश मते,ज्ञानेश्वर बागडे,भूषण प्रधान, रोशन दगडे, सुमित क्षीरसागर आदीसह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.कर्जत प्रेस क्लब ने पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांना निवेदन आणि पत्रकार हल्ला विरोधी कायदा यांची अधिसूचना सादर करून मारहाण करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई ची मागणी केली आहे.
नेरळ पोलिसांनी पत्रकार अजय गायकवाड यांच्या अर्जावर तात्काळ निर्णय घेत गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला.त्यात महाराष्ट्र शासनाने बनवलेल्या महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था यांचे हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधिनियम 2017 चे कलम 4 नुसार गुन्हा दाखल केला आहे.स्वतः पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर तसेच पोलीस उपनिरीक्षक गिरीश भालचिम हे पत्रकारांची भूमिका समजून घेत आहेत.तर सदर गुन्ह्याचा तपास रायगड पोलीस उपअधीक्षक विजय लगारे हे करणार आहेत अशी माहिती नेरळ पोलिसांनी दिली आहे
या प्रकरणाची माहिती होताच मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनी अजय गायकवाड यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली आहे.मराठी पत्रकार परिषदेचे संस्थापक एस एम देशमुख आणि परिषदेचे विश्वस्त किरण नाईक हे या प्रकरणी लक्ष ठेवुन आहेत.
अन्यथा आंदोलन...
संबंधित प्रकरणात पत्रकार अजय गायकवाड यांना मारहाण करणारा व्यक्ती सरकारी कर्मचारी असल्याची माहिती मिळत आहे.त्यामुळे पोलिसांनी दोन दिवसात आरोपी ला अटक केली नाही तर रायगड जिल्ह्यातील पत्रकार मराठी परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती कडून आंदोलन केले जाईल.
फोटो ओळ
1-कर्जत प्रेस क्लब चे सदस्य पोलिसांना निवेदन देताना
2-अजय गायकवाड आपले म्हणणे निवेदनातून देताना
3-हेच ते तोडण्यात आलेले शौचालय