प्रेस मीडिया ऑनलाइन
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर आणि भाजपचे नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे जगदीश गायकवाड यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून याच पार्श्वभूमीवर त्यांना तडीपार करण्यात आले
गायकवाड यांना रायगड ठाणे नवी मुंबईच्या हद्दीतून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले असून नवी मुंबई पोलिस आणि रायगड जिल्ह्याच्या बाहेर लोणावळा येथे त्यांना सोडले असून आगामी पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे
वादग्रस्त नगरसेवक गायकवाड यांनी ते पनवेल महापालिकेचे उपमहापौर असताना पालिकेच्या अधिकाऱ्यांना शिव्या दिल्याची क्लिप व्हायरल झाली होती. त्यावेळी याप्रकरणी विरोधी पक्षाने गायकवाड यांच्यावर चांगलीच टिकेची झोड उठवली होती.
जगदीश गायकवाड यांचा डिसेंबर महिन्यात वाढदिवस होता. हा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला होता. या सोहळ्याला महापौर कविता चौतमोल, आमदार प्रशांत ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कित्येक लोकांनी मास्क देखील घातले नव्हते. तसेच पनवेलच्या महापौर कविता चौतमोल यांनीही मास्क घातलेले नव्हते. हा वाढदिवस फुटपाथवर साजरा करण्यात आला होता.