तपास कामाबाबत पोलीस खात्याच्या मात्र विश्वामित्री पवित्रा..
प्रेस मीडिया लाईव्ह :
रायगड जिल्हा प्रतिनिधी : सुनील पाटील
आजम शेख करतोय पोलिसांची दिशाभूल पुढील कारवाई निष्पन्न व्हावी किंवा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग अलिबाग यांच्याकडे पुढील कारवाई करता पाठवण्यात यावे अशी मागणी अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया रायगड जिल्हा जयेश जैन यांनी मागणी केली आहे.
गुटखा किंग केतन कमलाकर गोगले आणि गुटका किंग आझम शेख त्यांच्यावर अन्न व औषध प्रशासन अधिकारी ह्यांचे कडून पकडण्यात आलेल्या गुटका संबंधी पुढील कारवाई पोयनाड पोलीस ठाणे येथे चालू असून पोलिसांची दिशाभूल करण्याचे काम आजम शेख करीत असल्याचे निदर्शनात येत असून पुढील कारवाई ही निष्पक्ष व्हावी किंवा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग अलिबाग यांचेकडे वर्ग करण्यात यावी अशी मागणी अँटिकरप्शन फौंडेशन ऑफ इंडिया श्री जयेश जैन यांनी निवेदनाद्वारे केली आहे..
महाराष्ट्र स्टेटचे डायरेक्टर आणि अँटिकरप्शन फौंडेशन ऑफ इंडिया श्री जयेश जैन यांनी वारंवार सर्व अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून पोलीस खाते रायगड द्रक्स अंड फुड फुड्स यांना ते सतत गुटका माफिया त्यांच्या विरोधात नावानिशी व फोन नंबर डिटेल सर्व देऊन सुद्धा कारवाई का होत नाही याचे अर्थपूर्ण गुड गुलदस्त्यात बंद आहे.
लहान मुले वृद्ध सर्व व्यसनाच्या आहारी गेली असून कॅन्सर सारख्या आजाराला बळी जात आहेत आम्ही याच्यवरती नेहमी आवाज उठवत असतो आम्हाला सहकार्य मिळत नाही पोलीस अधिकारी सुद्धा याबाबत जाणीवपूर्वक लक्ष देत नाहीत. या तपासाबाबत पोलीस खात्याच्या मात्र विश्वामित्री पवित्रा घेतल्याचे दिसत आहे.
रायगड जिल्हा व्यसनमुक्त करूया अशी त्यांची कल्पना आहे तर गुटका माफिया यांना जिल्ह्यातून हद्दपार करा अशी जोरदार मागणी सुरु आहे.रायगड पोलिस यंत्रणा नेमकं रायगडमध्ये काय करतात.? याचा प्रश्न सर्वानाच पडला आहे . पोलीस खात्याने या बाबत चा तपास प्रामाणिक पणे करून गुन्हेगारांवर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करण्यात यावीअशी मागणी अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया रायगड जिल्हा जयेश जैन यांनी मागणी केली आहे.