रखडलेल्या रामराज रोहा रस्त्यासाठी शेकापचा हल्लाबोल



प्रेस मीडीया ऑनलाईन

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

शेतकरी कामगार पक्षाच्या रास्ता रोको आंदोलनामुळे सुरू झालेल्या अलीबाग रामराज रोहा रस्त्याचे काम पुन्हा एकदा रखडल्याने शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाला आहे रखडलेले काम त्वरित सुरू करण्याच्या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख नगरसेविका चित्रलेखा पाटील आणि तालुका चिटणीस अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर हल्लाबोल



अलीबाग रामराज रोहा या अनेक वर्ष रखडलेल्या रस्त्याच्या कामाला शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील  अलिबाग रामराज रोहा या अनेक वर्षे रखडलेल्या रस्त्याच्या कामाला शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील आणि तत्कालिन आमदार पंडित पाटील यांनी मंजुरी मिळवून आणली. मात्र राजकारण करीत सदर रस्त्याच्या कामाला तत्कालिन सेना-युती सरकारने सुरुवात करुन दिली नाही. शेवटी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुरोगामी युवक संघटनेने रस्त्यावर उतरत रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनाच्या तडाख्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने सदर रस्त्याचे काम सुरु करण्याचे आश्‍वासन मुख्य अभियंता सुखदेवे यांनी आंदोलन स्थळी येऊन दिले होते. त्यानुसार काही दिवसातच सदर रस्त्याचे काम सुरु करण्यात आले. त्यावेळी कसलाही संबंध नसलेल्या काही उपटसुंभांनी येऊन श्रेय लाटण्याचा केविलवाणे प्रयत्न देखील केले.

मात्र पुन्हा एकदा हे काम रखडले आहे. अतिशय वाईट अवस्था झालेल्या या रस्त्यामुळे या रस्त्यावरुन प्रवास करणार्‍यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अपघातांमुळे अनेकांना प्राण देखील गमवावे लागले तर अनेकजण जखमी देखील झाले. बाळंतपणासाठी या मार्गावरुन जाणार्‍या आयाबहिणींना अतोनात यातनांना सामोरे जावे लागत आहे. या सर्व प्रकारामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला आहे. त्यामुळे महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील आणि तालुका चिटणीस अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकापक्षाचे शिष्टमंडळाने लक्षवेधी इशारा देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक दिली.

मात्र यावेळी कोणीही जबाबदार अधिकारी कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे शिष्टमंडळाच्या संतापाचा पारा चढला. कसलेही जबाबदार उत्तर देऊ न शकणार्‍या या कर्मचार्‍यांना शेकाप नेत्यांनी खडेबोल सुनावत तातडीने वरिष्ठांना कार्यालयात बोलावण्याच्या सुचना केल्या. त्यावेळी चित्रलेखा पाटील, अनिल पाटील आणि सुधीर चेरकर, विक्रांत वार्डे, रमेश पाटील, जया तांबटकर, मधू ढेबे, मोहन धुमाळ, अरुण भगत यांनी सदर रस्त्याचे काम का रखडले आहे याचा जाब विचारला. त्यावर कंत्राटदाराने काम थांबवले असल्याचे सांगत ते पुन्हा सुरु करण्यासाठी पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगितले.

मात्र संतप्त शिष्टमंडळाने कागदी घोडे न नाचविता तात्काळ काम सुरुच झाले पाहिजे असे सुनावत कंत्राटदाराला संपर्क साधण्यास सांगितले. त्यावर मोबाईलवरुन कंत्राटदार आणि अभियंता डोंगरे यांच्यात संभाषण होऊन शिष्टमंडळाला लगेच काम सुरु करण्याचे आश्‍वासन देण्यात आले. मात्र त्वरीत काम सुरु न झाल्यास शेकापक्षातर्फे उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

शेकापक्षाच्या प्रयत्नांने सुरु झालेले काम अधिकारी आणि कंत्राटदाराच्या चालढकलपणामुळे रखडले आहे. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणार्‍यांचे अतोनात हाल होत आहेत. जर त्वरीत रखडलेले काम पुन्हा सुरु न केल्यास शेकापक्षातर्फे उग्र आंदोलन छेडण्यात येईल.

चित्रलेखा पाटील

शेकाप महिला आघाडी प्रमुख

अलिबाग रोहा रस्त्याचे सुरु करण्यात आलेले काम रखडण्यामागे नक्की काय कारण आहे हे पुढे येत नाही. जर बांधकाम विभाग आणि कंत्राटदाराने सदर काम त्वरीत सुरु न केल्यास त्यांना शेकापक्षाच्या स्टाईलने धडा शिकवला जाईल.

अनिल पाटील

शेकापक्ष तालुका चिटणीस

रखडलेले काम त्वरीत सुरु न केल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना तसेच कंत्राटदाराला अद्दल घडवू.

सुधीर चेरकर

सरपंच वरंडे ग्रामपंचायत

सदर कामात कोणी लोकप्रतिनिधी टक्केवारी मागून त्रास देत आहे का? किंवा इतर मार्गाने आपल्याकडूनच साहित्य विकत घेण्यासाठी वा डंपर लावण्यासाठी दबाव आणत आहेत का याचीही विचारणा केली. जर कोणी असे प्रयत्न करीत असेल तर तसेच स्पष्ट सांगा, जर कोणी तसे करत असेल त्याला चांगलाच धडा शिकवून शेकापक्ष संरक्षण देईल अशी हमी यावेळी देण्यात आली. - मधू ढेबे, माजी सरपंच

बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी संपर्क साधा 85 30 83 87 12

Post a Comment

Previous Post Next Post