भ्रष्टाचारी आरमाईट विरुद्ध कारवाईस शासनाची दिरंगाई



प्रेस मीडिया ऑनलाइन

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील


 कोटी विद्या चैरिटेबल ट्रस्टचे अलामुरी रत्नमाला इंस्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नोलॉजी, सापगाव, शहापुर, ठाणे या महाविद्यालयात होणाऱ्या आर्थिक भ्रष्टाचार, शैक्षणिक गैरकारभार व बांधकाम घोटाळा प्रकरणी अनेक सामाजिक संघटना, पालक, विद्यार्थी-विद्यार्थिनी व कर्मचारी यांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई विद्यापीठ शुल्क नियामक प्राधिकरण, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद दिल्ली उच्च व तंत्रशिक्षण विभाग व संबंधित शिक्षण विभागातील अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी देवून देखील अनेक वर्षापासून पुराव्यानिशी पाठपुरावा करूनही ठोस कार्यवाही न झाल्याने वेगवेगळ्या ३० हुन अधिक तक्रारदारांनी श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थान, मुक्ता शिक्षक संघटना, छावा क्रांतीवीर संघटना तसेच सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अपर्णाताई खाडे व नितीका राव यांच्याकडे दाद मागितली होती.

सदर संघटनांनी अधिकृत पुरावे जमा करून शासकीय अधिकाऱ्यांकडे मागील २ वर्षापासून वारंवार पत्रव्यवहार केला व याप्रकरणी मा. राज्यपाल तसेच माजी विधानसभा अध्यक्ष यांची भेट घेऊन प्रकरण गंभीर असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर कार्यवाही करण्याचे आदेश मा. राज्यपाल व विधानसभा अध्यक्ष यांनी दिलेले असताना देखील संबंधित विभागांनी टाळाटाळ केली.

तरी देखील सततचा पाठपुरावा आमरण उपोषण, आत्मदहन सारख्या संविधानिक मार्गाचा अवलंब करत प्रशासनावर दबाव आणून सर्व संघटनांनी चौकशी समित्यांच्या नेमणुका करून तपास करण्यास भाग पाडले.त्यापैकी काही चौकशी समिती सदस्यांनी संगनमत करून सत्यता दडपणारे अहवाल दिल्याचे देखील तक्रारदारांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले.याप्रकरणी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या एकाच वर्षात आलेल्या तिसऱ्या चौकशी समितीने व तहसिलदार यांनी मात्र सर्व गैरकारभार समोर आणून खालील प्रकारे धक्कादायक खुलासे केलेले आहेत.

(१) सदर संस्थेने बनावट कागदपत्रे सादर करून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद यांच्या कडून मान्यता व मुंबई विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांचे कडून संलग्नता मिळवलेली आहे.

२) संस्थेच्या बांधकाम विषयीचे इमारतीचे बोगस दाखले सादर करून शासनाची फसवणूक केलेली आहे. कागदोपत्री

सादर केलेल्या इमारती व बांधकाम प्रत्यक्षात चोरीला गेलेले आहे.

३) कोटी विद्या चॅरिटेबल ट्रस्ट व कलाश्री वेंकटेश्वरा चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत हजारो विद्याथ्र्यांकडून बेकायदेशीर वाढीव शुल्क घेऊन संस्थाचालक व्यंकटेश गुप्ता व नवेंद्र बोधरा यांनी विद्याथ्यांची फसवणूक केलेली आहे. (४) नातेवाईक, मित्र परिवार व बोगस शिक्षक कर्मचारी यांची नावे शपथपत्रासह दाखवून कोट्यावधीचा अपहार केल्या प्रकरणी अजून देखील शुल्क नियामक प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही.

५) सदर प्रकरणी पुढील कार्यवाहीसाठी तंत्रशिक्षण संचालनालया मार्फत अहवाल शासनाला सादर करण्यात आलेला आहे.

[2/12, 11:18 PM] Prasad 2: 

६) मा. तहसीलदार शहापूर यांनी पुढील ७ दिवसात संस्थेचे अनाधिकृत इमारत पाडण्याचे आदेश दिलेले आहेत.

वरील सर्व प्रकार पाहता शासकीय अधिकारी वर्गासोबत संगनमत करून चौकशी समिती सदस्य व भ्रष्ट संस्थाचालक यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात ताबडतोब कारवाई साठी आम्ही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. उदय सामंत

व संबंधित अधिकारी यांच्याकडे खालीलप्रमाणे मागण्या करत आहोत.

१) अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी कागदपत्रांची शहानिशा न करता दिलेली संस्थेची मान्यतारद्द करावी. 

२) मुंबई विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने कागदपत्रांची तपासणी न करता दिलेली संलग्नता रद्दकरावी. 

३) उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सदर संस्थेच्या संस्थाचालकांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाईचे आदेश देऊन संस्थाचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत व अहवाल पुढील ७ दिवसात अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद् नवी दिल्ली यांना सादर करावा व यासंदर्भात एक प्रत तक्रारदारांना उपलब्ध करून द्यावी.

४) समाज कल्याण विभागाने शिष्यवृती संदर्भात झालेल्या घोटाळ्या ची चौकशी करून मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून

घेतलेले वाढीव शुल्क परत करावेत व शासनाच्या कोट्यावधी रुपयांचा परतावा करण्यास सांगावे.

५) शुल्क नियामक प्राधिकरणाने तक्रारीची व सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी.

६) वरील सर्व गैरकारभार प्रकरणी डोळेझाक करणारे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्र. कुलगुरू, कुलसचिव, शुल्क नियामक प्राधिकरणाचे सचिव व अध्यक्ष व संगनमत करून यापूर्वी सत्यता दडपणारे अहवाल शासनाला सादर करणारे सर्व चौकशी समिती सदस्य यांच्यावर कडक कारवाई व्हावी.

७) प्रधानमंत्री कौशल्य विकास योजने अंतर्गत चालवन्यात येणाऱ्या कोर्सेस मध्ये बोगस विद्यार्थी दाखवून केलेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी.

असे न झाल्यास शासनाच्या विरोधात श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे श्री. नितीन चौगुले व यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर तीव्र निदर्शने व आंदोलने करण्यात येतील.

या संदर्भात आपण आपल्या वृत्तपत्रात दैनिकात साप्ताहिकात व इतर सर्व प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसिद्धी देऊन भ्रष्टाचारास वाचा फोडून हजारो विद्यार्थी पालक व कर्मचारी यांना न्याय मिळवून द्यावा ही नम विनंती.


Post a Comment

Previous Post Next Post