प्रेस मीडिया ऑनलाईन
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनिल पाटील :
संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणेना 18 फेब्रुवारी पर्यंत कणकवली दिवाणी न्यालायने आज शुक्रवारी न्यायालीन कोठडी सुनावली आहे दरम्यान त्याची प्रकृती बिघडल्याने नितेश राणेना जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे
नितेश राणे यांची प्रकृती आधीपासूनच ठीक नसल्याचे त्यांच्या वकिलांकडून न्यायालयात सांगण्यात आले होते. त्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी नितेश राणेंना जिल्हा रूग्णालयातही आणण्यात आले होते.नितेश राणे यांना सावंतवाडी कारागृहात न ठेवता रुग्णालयात ठेवण्यात यावे, अशी मागणी नितेश राणे यांच्या वकिलांनी केली होती. नितेश राणे यांनीही ही माहिती न्यायालयात दिल्याचे समजते. दिवाणी न्यायालयातील सुनावणी संपल्यानंतर नितेश राणे यांच्या वकिलांनी सावंतवाडी कारागृह अधीक्षकांकडे यासंबंधीचा अर्ज दिला होता. नितेश राणे यांची प्रकृती आधीपासूनच बरी नव्हती. याबाबत आम्ही न्यायालयाला कळवले आहे. न्यायालयात सुनावनी नंतर आमदार राणे यांना जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आणले होते. यासंदर्भात त्यांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर नितेश राणे यांना कारागृहाऐवजी जिल्हा रुग्णालयातच ठेवण्यात आले आहे.
आमदार नितेश राणे यांच्यासह राकेश परबला सुद्धा न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे सुद्धा शुक्रवारी सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत. नितेश राणे यांच्या जामिनासाठी आजच सत्र न्यायालयात अर्ज करणार असल्याचे वकील मानशिंदे यांनी सांगितले.
आमदार नितेश राणे २ फेब्रुवारी रोजी कणकवली दिवाणी न्यायालयात हजर झाले होते. त्यानंतर कणकवली दिवाणी न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. राणे न्यायालयात शरण आल्यावर न्यायालयीन कोठडीचा आदेश झाला. तसेच फिर्यादी पक्ष आणि राणे यांच्या वकिलांना युक्तिवाद करण्याची संधी देण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने त्यांना ४ फेब्रवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र, आजही नितेश राणेंना दिलासा मिळाला नाही.