प्रेस मीडिया लाईव्ह :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील :
रत्नागिरी येथून प्रसिद्ध होणाऱ्या दैनिक सागर आणि महाराष्ट्र न्युज 24चे प्रतिनिधी अजय गायकवाड यांना मारहाण झाली होती.एका बातमीचा पाठपुरावा करीत असताना पोलीस कर्मचारी असलेल्या तरुणाने अजय गायकवाड यांना 15 फेब्रुवारी रोजी मारहाण केली होती.दरम्यान, या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात पत्रकार हल्ला विरोधी कायद्याखाली गुन्हा दाखल झाला होता,मात्र पोलीस प्रशासन आरोपी पकडण्याची कारवाई करीत नसल्याने रायगड जिल्ह्यातील पत्रकारांनी आज रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण सुरू केले होते.त्यानंतर कर्जत येतून पोलिसांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
दैनिक सागर आणि महाराष्ट्र् न्यूज 24 चे प्रतिनिधी अजय गायकवाड यांना बातमी देण्याच्या रागातून नेरळ येथील वाल्मिकी नगर येथील तरुणाने मारहाण केली होती. त्यानंतर घटना घडल्यानंतर त्याच दिवशी 15 फेब्रुवारी रोजी नेरळ पोलीस ठाण्यात अजय गायकवाड यांना मारहाण आणि हल्ला केल्याप्रकरणी पत्रकार हल्ला विरोधी कायद्याच्या महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान अधिनियम 2017 चे कलम 4 खाली जयेश उर्फ माँटी कदम त्याच दिवशी नेरळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या गुन्ह्यातील संबंधित आरोपी हा पोलीस कर्मचारी असल्याने पोलिसांनी त्या तरुणाला अटक केली नव्हती.त्यामुळे त्या आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी रायगड प्रेस क्लबच्या वतीने आज 21 फेब्रुवारी रोजी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केले होते.उपोषण सुरू होताच रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी रायगड प्रेस क्लब च्या प्रमुख पदाधिकारी यांना आपल्या कार्यालयात चर्चेसाठी बोलावून घेतले.तेथे रायगड प्रेस क्लबच्या पत्रकारांना पोलीस अधीक्षक यांनी कर्जत येथे पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतले असल्याची माहिती दिली. त्यावर कर्जत येथे असलेल्या पत्रकारांनी कर्जत उपअधीक्षक यांच्या कार्यलयात पाठवले.तेथे पोलीस ठाण्यात आरोपी तरुण अटक असल्याची खात्री पटल्यानंतर पत्रकारांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर सुरू केलेले उपोषण दुपारी स्थगित केले.
अखेर या उपोषणाला यश आले असून सदर आरोपी तरुण रेल्वे पोलीस जयेश कोंडीराम कदम यास नेरळ पोलिसांकडून अटक केली. संबंधित आरोपी तरुण हा पत्रकारांचे उपोषण सुरू झाल्यानंतर कर्जत येथील पोलीस उपअधीक्षक कार्यालयात स्वतःहून हजर झाला.त्यानंतर पोलिसांनी जयेश कदम या आरोपीला कर्जत येथील प्रथम वर्ग न्यायाधीश मनोद तोकले यांच्या समोर उभे केले असता समज देऊन जामीन मंजूर केला.