मनाई आदेशाचा भंग केल्या प्रकरणी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
प्रेस मीडिया ऑनलाइन
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
पनवेल महापालिकेने नागरिकांना मालमत्ता कराच्या नोटिसा दिल्या आहेत या प्रकरणी नवी मुंबई 95 गाव नयना व इतर प्रकल्पग्रस्त समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका नोटिसांची होळी करून आंदोलन केले त्यामुळे खारघर पोलिसांनी ॲड. सुरेश ठाकूर यांच्यासह नगरसेवक व इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांसह २५ कार्यकर्त्यांवर मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत आंदोलन करण्यास मनाई करण्यात आली आहे. नवी मुंबई ९५ गाव, नैना व इतर प्रकल्पग्रस्त समितीच्या वतीने ॲड. सुरेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महापालिकेने मालमत्ता कराच्या अवास्तव व अन्यायकारक नोटिसा नागरिकांना दिल्याने त्याच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी निषेध आंदोलन केले. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी खारघर येथील महापालिका अ प्रभाग समिती कार्यालयासमोर नोटिसांची होळी करून महापालिकेच्या विरोधात घोषणा दिल्या.
कोरोना नियमावलीचे पालन न करणे, तसेच त्यांनी पोलिसांनी लागू केलेल्या मनाई आदेशाचा भंग केला. त्यामुळे खारघर पोलिसांनी समितीचे पदाधिकारी ॲड. सुरेश ठाकूर, नगरसेवक अरविंद म्हात्रे, नगरसेवक रवींद्र भगत, गोपाळ भगत, केसरीनाथ पाटील, फारुक पटेल, गुरुनाथ खडतर, जगदीश ठाकूर, इस्माईल पटेल, ॲड. विजय घाडगे, संतोष गायकर व इतर १५ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.