प्रेस मीडिया लाईव्ह
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
अलिबाग, ता. २५ : युक्रेनमध्ये शिक्षण घेण्यासाठी गेलेले रायगडातील २५ विद्यार्थी हे युक्रेनच्या विविध भागांत अडकले आहेत. यातील बहुतांश विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्यात यश आले आहे.या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आम्हाला भारतात घेऊन या, अशी विनंती केली आहे.
रायगडातील अलिबाग, महाड, पेण, तळा, माणगाव, खोपोली, पनवेल या तालुक्यातील विद्यार्थी अडकले आहेत. जिल्हा प्रशासनाकडे याबाबत माहिती प्राप्त झाली असून त्याबाबत राज्य सरकारला कळविण्यात आले आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आज जिल्हा प्रशासनाने मदत केंद्र जाहीर केल्यानंतर रायगड येथील डॉक्टरी शिक्षणासाठी गेले २५ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती पालकांनी जिल्हा प्रशासनाला कळवली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रशासन परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून प्रयत्न करीत आहे.
पेण मधून आर्यन पाटील, कोमल पाटील, कल्पित मढवी, श्रद्धा पाटील, प्रेरणा दिघे, खोपोलीतील अभिजित अशोक थोरात, सालवा धनसे, पनवेलमधील साहिल म्हामूणकर, श्रेयस टिळे, अद्वैत गाडे, समीक्षा शिरसाट, प्रचिती पवार, कुंजल कुवेसकर, शिल्पीता बोरे, रुशवंती भोगले, महाड तालुक्यातील मुग्धा मोरे, शोहिब पठाण, अलिबागमधील पूर्वा पाटील, यश काळबेरे (तळा), विजया माने (कर्जत), साई मोरे (खालापूर), अमर करंजीकर (माणगाव), नाहुश गायकवाड (रोहा), श्रेयस तिळे (कर्जत), जयपाल परमार (मोहपाडा) येथील एक विद्यार्थी असे एकूण २५ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत.