आरपीआय नेते जगदिश गायकवाड यांच्या तडीपार आदेशाचा जाहिर निषेध

 


प्रेस मीडिया ऑनलाईन

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

 लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, यासाठी सुरु असलेल्या चळवळीत प्रामुख्याने सहभागी असलेले आरपीआयचे कोकण प्रांत अध्यक्ष व पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर जगदिश गायकवाड यांना पोलिसांच्या माध्यमातुन ठाकरे सरकारने तडीपारीचा जो आदेश काढला आहे,त्याचा लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्व पक्षीय कृती समितीने जाहीर निषेध केला आहे. त्या संदर्भातील निषेधाचा पत्रक समितीच्या वतीने काढण्यात आले आहे.

     लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे,यासाठी सुरु असलेल्या आंदोलनात मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त भूमिपूत्र एकत्र झाला आहे.या आंदोलनात सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचा सहभाग आहे.त्याप्रमाणे आरपीआयचे नेते जगदिश गायकवाडही सहभागी आहेत.त्यांनी या चळवळीत बहुजन समाजाचे प्रश्न हिरीहिरीने मांडले.हा लढा पुढे नेण्यासाठी जोरदार प्रयत्न केले.त्यामुळे ही चळवळ अधिक फोफावली,असे असताना ही चळवळ चेपण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने त्यांना पोलिसांच्या माध्यमातून तडीपारीचा आदेश काढला.परंतु ही चळवळ आता अधिक जोमाने फोपावेल हे सरकारने लक्षात घ्यावे,या तडीपार आदेशाचा लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई विमानतळ सर्व पक्षीय कृती समिती जाहीर निषेध करीत असून लवकरच राज्याचे गृहमंत्री ना.दिलीप वळसे पाटील यांची या संदर्भात भेट घेऊन त्यांना हा आदेश रद्द करणारे निवेदन देण्यात येईल, असे कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील व कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post