रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
मुली व महिलांच्या सुरक्षिततेकरीता भरोसा सेलने राबविण्यात आलेल्या कार्यक्रमांबाबत “महिला आणि मुलांच्या सुरक्षेसाठी कटिबध्द" या पुस्तिकाचे प्रकाशन दिनांक 14/02/2022 रोजी करण्यात व. पोलीस अधीक्षक कार्यालय अलिबाग-रायगड येथे भरोसा सेल येथील पोलीस अधिकारी व महिला पोलीस अंमलदार यांनी मुली व महिला यांचे सुरक्षितेबाबत तसेच सायबर गुन्हयाबाबत. रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रात दिनांक 09/12/2021 ते 12/12/2021 रोजी "दि आंगण ट्रस्ट " भरोसा सेल " येथील अधिकारी व महिला पोलीस अंमलदार तसेच पोलीस दिदी व पोलीस काका यांचे सहकार्याने किशोरवयीन मुलां/मुलीमध्ये कौटुंबिक हिंसाचार, सामाजिक गुन्हेगारी, सायबर गुन्हेगारी इत्यादीचे प्रमाण वाढत असल्याने त्याबाबत किशोरवयीन मुलां/मुलींमध्ये जनजागृती करून मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच दिनांक 20/12/2021 ते दिनांक 27/12/2021 व दिनांक 01/02/2022 ते दिनांक 04/02/2022 या कालावधीत महिला व मुलींवर वाढते अत्याचार याबाबत महिलांना त्यांचे न्याय हक्काबाबत व सरंक्षणाबाबत कायदयाची माहिती असावी यांकरीता रायगड जिल्हयातील प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीतील शाळा, कॉलेज, कंपनी मध्ये काम करण्या-या महिला बचत गट, महिला पोलीस पाटील, महिला दक्षता समिती सदस्य, शासकिय कार्यालयातकाम करणा-या महिला कर्मचारी यांना महिला विभाग / भरोसा सेल रायगड मधील पोलीस अधिकारी व महिला पोलीस अंमलदार यांनी मार्गदर्शन करून जनजागृती करून मार्गदर्शन करण्यात आले. वरील प्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांविषयी “महिला आणि मुलांच्या सुरक्षेसाठी कटिबध्द" ही पुस्तिका बनविण्यात आली. सदर पुस्तिकेचे मा.श्री.राजेंद्र सिंह, अपर पोलीस महासंचालक, (कायदा व सुव्यवस्था) महाराष्ट्र, राज्य मुंबई यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
सदर कार्यक्रमास मा.श्री. अशोक दुधे, पोलीस अधीक्षक, रायगड अलिबाग मा.श्री. अतुल उ झेंडे, अपर पोलीस अधीक्षक, रायगड अलिबाग सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच मा. श्री. अनिल लाड आर्थिक गुन्हे शाखा अलिबाग रायगड, मा. श्री. दयानंद गावडे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबाग तसेच महिला शाखेच्या प्रभारी महिला अधिकारी श्रीमती. उत्कर्षा प्रमोद देशमुख, श्रीमती ज्योती राजेंद्र खराडे कार्यालयीन अधीक्षक (अति. कार्यभार) व लिपिक कर्मचारी, तसेच पोलीस मुख्यालयातील अधिकारी हे उपस्थितीत होते.