प्रेस मीडिया ऑनलाइन
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
टेरव:--कुलस्वामिनी श्री भवानी - वाघजाई मंदिर, श्री क्षेत्र टेरव येथे पालकमंत्री श्री अनिल परब यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून अनेक कामांचे नुकतेच भूमिपूजन करण्यात आले. सदर प्रसंगी सर्वश्री आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेशभाई कदम, सदानंद चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम, शिवसेना तालुका प्रमुख प्रतापराव शिंदे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष जयेंद्र खताते, काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रशांत यादव हे मान्यवर तसेच अनेक ग्रामस्थ उपस्थित होते *क* पर्यटन विकासांतर्गत रुपये तीस लाख मंजूर झाले असून सदर निधीतून उद्यान मातीकरण करणे व मातीचे सरंक्षण करण्यासाठी जांभा बांधकाम करणे तसेच सहाण, लाटेचा खांब, होम परिसर यांचे सुशोभीकरण करणे तसेच सांस्कृतीक मंचावर लादी घालणे ही कामे हाती घेण्यात येणार आहेत.
सदर प्रसंगी पालकमंत्र्यांनी या देवस्थानास पर्यटनाचा *ब* दर्जा देण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले. तसेच पालकमंत्री श्री अनिल परब यांनी स्वयंभू लिंगेश्वर मंदिरास भेट देऊन मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे तसेच रस्त्यालगत सरंक्षण भिंत उभारणे या कामाचे भूमिपूजन करून सदर देवस्थानास पर्यटनाचा *क* दर्जा बहाल करण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले. सदर कामासाठी श्री प्रमोद तातोजीराव कदम, लिंगेश्वरवाडी टेरव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेशभाई कदम यांच्या शुभहस्ते तांदळेवाडी - मोहल्ला रस्ता तसेच मुस्लिम मोहल्ला स्मशानभुमीस सरंक्षक भिंत बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. आमदार निधीतून पिकशेड तें श्री भवानी - वाघजाई मंदिराकडे जाणारा रस्ता मंजूर करून त्याचेही भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
आमदार श्री शेखर निकम यांनी ग्राम - समृद्धी योजनेअंतर्गत टेरव - बौद्धवाडी विहीर ते लखुडी पऱ्या ते अडरे रास्त तसेच टेरव - कोंडमाळा - धनगरवाडी - टेरव या रस्त्यांना प्राधान्य दिल्यामुळॆ गावातील प्रमुख दळणवळणाचा प्रश्न सुटून शेतकऱ्यांना आपल्या शेतापर्यंत सहज जाता येईल. अडरे गावापर्यंत रस्ता व्हावा ही ग्रामस्थ्यांची जुनी मागणी मान्य केल्याबद्दल टेरव ग्रामस्थांनी आमदारांचे आभार मानले.
टेरव गावाचा तसेच मंदिराचा *क* पर्यटन क्षेत्राअंतर्गत विकास व्हावा म्हणून आमदार श्री शेखर निकम यांनी महाराष्ट्र शासनाला पाठविलेल्या प्रस्तांवाबाबत गाव समिती, प्रतिष्ठीत ग्रामस्थ ज्यांचे देवस्थान उभारण्यात मोठे योगदान आहे अशाना पत्राद्वारे पर्यटन विकासांतर्गत किती कामे मंजूर झाली व किती प्रस्थावित आहेत याबाबत अवगत करण्यात येईल. तसेच ग्रामस्थांना विश्वासात घेऊन विकास कामांना प्राधान्य देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. देवस्थांमधील खालील कामे मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत.१. देवस्थान परिसरामध्ये उद्यानास पाणी पुरवठा करण्यासाठी विहीर बांधून टाकी बांधणे. २. देवस्थानास भेट देण्याऱ्या भाविक व पर्यटकांसाठी स्वतत्र स्त्री पुरुष प्रसाधन गृह बांधणे.३.देवस्थानास भेट देण्याऱ्या भाविक व पर्यटकांसाठी पिण्याच्या पाण्याची कूपनलिकेद्वारे व्यवस्था करणे.
ग्रामस्थांतर्फे पालकमंत्री तसेच वरील सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. वरील भूमिपूजन प्रसंगी सरपंच सौ. स्वप्नाली कराडकर, उपसरपंच श्री विश्वनाथ पंडव, माजी सरपंच श्री किशोर कदम, सौ. मानसी कदम व इतर ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील श्री सुहास मोहिते, तंटा मुक्ती अध्यक्ष श्री एकनाथ माळी, रयत संघटना अध्यक्ष व माजी सरपंच ॲडवोकेट मनोहर यादव, देवस्थानचे खजिनदार श्री राजेंद्र कदम, श्री तुकाराम साळवी व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या वतीने आभार मानून पालकमंत्री श्री अनिल परब, आमदार श्री शेखर निकम, माजी आमदार श्री रमेशभाई कदम, उपसभापती श्री प्रतापराव शिंदे यांच्यावतीने करण्यात येणाऱ्या विकास कामाच्या प्रत्येक उपक्रमास टेरव ग्रामस्थांचे सहकार्य लाभेल असे सांगण्यात आले.--रायगड चा युवक