सहा तरुणींची सुटका करण्यात आली आहे.
प्रेस मीडिया ऑनलाइन :
रायगड जिल्हा प्रतिनिधी : सुनील पाटील
मुबई नजीक असणाऱ्या पनवेल येथील खांदेशोर पोलिसांनी एका मोठया सेक्स चा पर्दाफाश केला आहे या छापेमारी मध्ये पोलिसांनी पीडित तरुणीं कडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या दोघांना अटक (arrested) करण्यात आली आहे. तसेच एकूण ६ जणींची सुटका केली आहे. संबंधित आरोपी परराज्यातील रहिवासी असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. पोलिसांनी (police) आरोपींना (accused) न्यायालयात (court) हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास खंडेश्वर पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेल येथील खन्दा कॉलनी परिसरामधील एका इमारतीत वेश्याव्यवसाय सुरू होता. याठिकाणी काही तरुणींकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे मुंबई गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने संबंधित ठिकाणी छापेमारी केली आहे. या छापेमारीमध्ये पोलिसांनी २ दलालांना अटक करण्यात आले आहे. ६ तरुणींची सुटका करण्यात आली आहे.
संबंधित तरुणींना उत्तर प्रदेश राज्यस्थान, आगरा आणि दिल्ली परिसरामधील विविध ठिकाणाहून आणल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. संबंधित तरुणींकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेतला जात आहे. आरोपी तरुण हे पीडित तरुणींचे फोटो ग्राहकांना पाठवून त्यांना आपल्या जाळ्यात ओढत होते. ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम घेतली जात होती. ज्यामधून आरोपींना कमीशन मिळत होते. आरोपींकडून पीडित मुलीच्या शरीराचा रोज सौदा केला जात होता.
या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळाल्यावर खंडेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित ठिकाणी मुंबई गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापेमारी करत ६ तरुणींची सुटका करण्यात आली आहे. त्यांना महिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. अटक केलेल्या आरोपींपैकी एक आरोपी बिहार तर दुसरा आरोपी उत्तर प्रदेश मधील रहिवासी आहे. या सेक्स रॅकेट प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.