रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक यांना निवेदन.
प्रेस मीडिया लाईव्ह :
रायगड जिल्हा प्रतिनिधी : सुनिल पाटील :
दिनांक 17 2 20 22 रोजी पोयनाड पोयनाड पोलीस स्टेशनचे हद्दीत बेकायदेशीररित्या गुटखा अन्न भेसळ निरीक्षक यांनी पकडला होता या मुळे सर्वत्र जोरदार खळबळ उडाली होती या प्रकरणी. केतन कमलाकर गोगले व दिलीप जयस्वाल यास अटक केली असून सदरचा माल आजम फारुक शेख याचा होता .या नंतर कामरान हा अलिबाग मज्जिद मध्ये नमाज पडण्यासाठी गेला तेथे आजम फारुक शेख उर्फ राजू याने मला ईमरान ला सांग माझ्या मालाची खबर पोलिसांना देणे बंद कर नाहीतर त्याला मी त्याच्या घरात मादक पदार्थ टाकून त्या केसमध्ये गुंतविणे आयुष्यभर जेलमध्ये तसेच घरात घुसून त्याच्या बायकोला उचलून नेईन व इम्रानला गुंडाना सुपारी देऊन खल्लास करून टाकीन...अशी धमकी दिली.
या बाबत इमरान शमशाद अन्सारी रा. कुरूळ, ता. अलिबाग, जि. रायगड याने जिल्हा पोलीस अधिक्षक सो., रायगड अलिबाग यांना लेखी निवेदन देवून या निवेदनात माझ्या जिवीतास तसेच माझे पत्नी व मुलाचे कुटुंबियांचे जिवितास धोका निर्माण झाला असून त्यांचेवर कडक कारवाई करणेत येऊन मला संरक्षण मिळावे अशी मागणी इमरान अन्सारी यांनी (इमरान शमशाद अन्सारी) निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर इमरान शमशाद अन्सारी) यांचे स्वाक्षरी आहे.