निरुपणकार सचिनदादा धर्माधिकारी यांना 'युरोपियन इंटरनॅशनल इन्स्टीट्यूट' कडून डॉक्टरेट पदवी बहाल


प्रेस मीडिया लाईव्ह

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी :  सुनील पाटील

रायगडातील श्री सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा'च्या निरुपणाचे अलौकिक कार्य करणारे, रायगड भूषण निरुपणकार सचिनदादा धर्माधिकारी यांना 'युरोपियन इंटरनॅशनल इन्स्टीट्यूट'कडून मानाची डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली आहे.तर प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनाही 'लिव्हींग लिजेंड' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.युरोपियन इंटरनॅशनल इन्स्टीट्यूटने ज्येष्ठ निरुपणकार डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिनदादा धर्माधिकारी यांना सन्मानित केल्यानंतर रायगडातील सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांनी सुरु केलेल्या श्री समर्थ दासबोधाच्या निरुपणाला समाजकार्याची अलौकीक कार्याची अखंड परंपरा, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व रायगड भूषण सचिनदादा धर्माधिकारी यांचया मार्गदर्शनाखाली अखंड सुरु आहे. त्यांच्या या कार्याबद्दल भारतातच नव्हे, तर परदेशातही गौरव केला जात आहे.

https://youtu.be/sQKX0K3XeTY

परमार्थासोबत समाजकार्याची शिकवण देणार्‍या जगभरातील संस्थामध्ये डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आघाडीवर आहे. निरुपणकार सचिन धर्माधिकारी यांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीसह स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड, आरोग्य शिबीर, जलसंधारणाचे कार्य, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरिता आवश्यक असणारे प्रशिक्षण, तलाव-विहिर-धरण गाळ उपसा, ग्रामस्वच्छतेचे उपक्रम राबवत धर्माधिकारी प्रतिष्ठानने मोलाचे कार्य केले आहे.

सर्व उपक्रम राबविताना सचिन धर्माधिकारी हे स्वतः तळागाळापर्यंत जाऊन प्रत्येक कामाचे नियोजन करतात. त्यांच्या या कार्याची दखल घेत, युरोपियन इंटरनॅशनल इन्स्टीट्यूटने त्यांना 'डॉक्टरेट' बहाल केली. आज (25 फेब्रुवारी) थायलंडमधील बँकॉक येथे आयोजित सोहळ्यात सचिन धर्माधिकारी यांना गौरविण्यात आले.

याच कार्यक्रमात ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 'लिव्हींग लिजंड' हा देऊन सन्मानित करण्यात आले. या अलौकिक सोहळ्यानंतर रायगडातील श्री सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post