रसायनीतील डॉ. पद्माकर मते आणि सौ मधुमती मते यांच्या कन्येची, डॉ. पायल मते यांची गगनभरारी..!

 


प्रेस मीडीया ऑनलाईन :

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

' बरेली आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, रोहीलखंड मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल ' येथे फेलोशीप कार्यक्रमाचे एक वर्ष संपन्न झाल्याच्या उद्देशाने 'ओरल कॅन्सर सर्जरी क्लिनिकल मिट ' या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. सरासरी शंभर लोकांमध्ये एक व्यक्ती तोंडाच्या कर्करोगाने मृत्यू पावते, अशा या भयानक समस्येला कसे सामोरे जाता येईल तसेच इतर महत्त्वाच्या समस्या  याबद्दलच्या चर्चासत्रात रसायनीच्या डॉ.पद्माकर मते यांच्या सुकन्या  डॉ. पायल पद्माकर मते यांनी आपली मौलिक मतं यावेळी इतर मान्यवरांसोबत  मांडली. 

KIMS कॉलेज( कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स), कराड येथे त्या  ओरल आणि मॅक्सिलोफेशियल ( पुनर्रचनात्मक ) शस्त्रक्रिया यामध्ये विद्यापीठात टॉपर होत्या.  तोंडाचा कर्करोग आणि पुनर्रचनात्मक शस्त्रक्रियेमध्ये त्यांना बरेली आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची फेलोशिप मिळाली आहे. नुकत्याच त्या बरेली आंतरराष्ट्रीय विद्यापीठ अंतर्गत रोहीलखंड मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल , उत्तर प्रदेश येथे महत्त्वाच्या पदावर  कार्यरत आहेत.  या त्यांच्या अभूतपूर्व यशात डॉ.पद्माकर मते आणि सौ मधुमती मते यांचा मोठा वाटा आहे.

Post a Comment

Previous Post Next Post