स्थायी समितीच्या निवृत्त होणार्‍या आठ सदस्यांच्या जागी नवीन सदस्यांची आज निवड केली.

 राष्ट्रवादी कॉंग्रेसने विशाल तांबे आणि अश्‍विनी कदम या दोन माजी अध्यक्षांना पुन्हा संधी दिली 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

जिलानी (मुन्ना) शेख :

पुणे : स्थायी समितीच्या निवृत्त होणार्‍या आठ सदस्यांच्या जागी नवीन सदस्यांची आज खास सभेत निवड केली गेली. राष्ट्रवादी कॉंग्रेसने विशाल तांबे आणि अश्‍विनी कदम या दोन माजी अध्यक्षांना पुन्हा संधी दिली आहे.तर भाजप, शिवसेना आणि कॉंग्रेसने त्यांच्या सदस्यांना पुन्हा संधी दिली आहे. आता अध्यक्ष पदाच्या निवडीकडे आणि अंदाजपत्रक सादर करण्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे. विशेषत: अंदाजपत्रक सादर करण्यावरून राजकारण रंगणार हे मात्र निश्चित आहे.

स्थायी समितीच्या आठ सदस्यांची मुदत २८ फेब्रुवारी रोजी संपत आहे. या आठ जागांसाठी सोमवारी खास सभेत निवड झाली. प्रत्येक पक्षाकडून त्यांच्या एकुण सदस्य संख्येनुसार सदस्यांची नावे देण्यात आली होती. भाजपने त्याचे पुर्वीचे सदस्य असलेल्या नगरसेविका मानसी देशपांडे वर्षा तापकीर उज्वला जंगले यांना पुन्हा संधी दिली. तर शिवसेना आणि कॉंग्रेसने विद्यमान सदस्य अनुक्रमे बाळा ओसवाल, लता राजगुरु यांना पुन्हा संधी दिली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने मात्र, विद्यमान सदस्य नंदा लोणकर आणि अमृता बाबर यांना संधी न देता स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे आणि अश्विनी कदम यांना संधी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post