भाजपच्या बालेकिल्ला मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीचं नारळ फोडला.
प्रेस मीडिया ऑनलाइन :
जीलानी (मुन्ना) शेख :
पुण्यात राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली पुण्यातील वडगाव शेरी हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. पण याच बालेकिल्ल्यातून राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीचं नारळ फोडला आहे.
वडगाव शेरीतील भाजप नगरसेविका शितल सावंत यांचे पती अजय सावंत यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांनी भाजपचे तब्बल 25 नगरसेवक राष्ट्रवादी घेऊन येणार असल्याची घोषणा केली आहे. वडगाव शेरीनंतर चाकण येथील तीन नगरसेवकांनीदेखील भाजपचा सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रणधुमाळी आधीच राष्ट्रवादी काँग्रेसची पक्षांतराची वेगवान निघालेल्या या गाडीला भाजप कसं रोखतं आणि प्रत्युत्तर देत पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
त्यामुळे साहजिकच तिथली बरीचसी राजकीय खेळी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती आली. वडगाव शेरीत आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचाच असल्याने महापालिका निवडणुकीत त्या मतदारसंघात राष्ट्रवादीला चांगला फायदा मिळू शकतो. कारण आमदार सुनील टिंगरे देखील 25 नगरसेवकांना फोडायची भाषा करत आहेत. या भाजपसाठी मोठा इशारा आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज ज्यांनी प्रवेश केला ते अजय सावंत यांचं राष्ट्रवादी काँग्रेससोबतचं जुनं नातं आहे. त्यांच्या वॉर्डमध्ये ते प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्या वॉर्डमध्ये ते किंवा त्यांची पत्नी निवडून येणं ही सामान्य बाब मानली जाते. अर्थात विरोधकांचं आव्हान असतंच.
पण तरीही निवडणुकीत बाजी मारण्याचं कौशल्य किंवा राजकीय डावपेच लढवण्याचं कौशल्य सगळ्यांकडेच नसतं. अजय सावंत यांच्या पत्नी गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर निवडून आल्या होत्या. त्याआधी अजय आणि त्यांच्या पत्नी शितल या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. पण त्यावेळच्या एकंदरीत वातावरणात त्यांनी भाजपची साथ पकडली होती. पण तरीही देर आए दुरुस्त आहे, सावंत कुटुंबाने पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे.