शांतीश्री पंडित यांच्या नियुक्तीची चौकशी करावी,

अशी मागणी विविध विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे.

प्रेस मीडिया ऑनलाइन :

जीलानी (मुन्ना) शेख

पुणे : शांतीश्री पंडित यांच्या नियुक्तीची चौकशी करावी, अशी तक्रार नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडे ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे.

विद्यापीठाच्या कुलगुरू पदी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीची नियुक्ती केली जाते. परंतु, गेल्या काही वर्षांपासून रजेवर असणाऱ्या शांतीश्री पंडित यांनी शिक्षण क्षेत्रासाठी कोणते योगदान दिले, असा प्रश्न माजी अधिसभा सदस्यांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशाने दिलेल्या अहवालानुसार पंडित यांच्यावर पाच वेतनवाढी रोखण्याची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे अशा वादग्रस्त व्यक्तीची जेएनयुसारख्या नामांकित विद्यापीठाच्या कुलगुरू पदी नियुक्ती झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

एखाद्या प्राध्यापकाला जास्तीत जास्त तीन वर्षे विना वेतन रजेवर जाता येते. परंतु, पंडित या चार वर्षांहून अधिक काळ रजेवर होत्या. तसेच एवढा काळ रजेवर असताना विद्यापीठाने पुन्हा त्यांना कामावर कोणत्या नियमानुसार रुजू करून घेतले..? हा संशोधनाचा भाग आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी विविध विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे.


शांतीश्री पंडित या कालावधीत बिन पगारी रजेवर

१ मे २०१७ ते २७ जुलैै २०१७ : एकूण ८८ दिवस

१ जुलैै २०१७ ते १५ मार्च २०१८ : एकूण २२७ दिवस

२ जुलैै २०१८ ते २६ ऑक्टोबर २०१९ : एकूण ४८२ दिवस

१ जानेवारी २०२१ पासून पुढे ३८४ दिवस रजेवर

Post a Comment

Previous Post Next Post