पुणे महानगरपालिकेत भाजपा कार्यकर्त्यांनी घातलेला गोंधळ

हा सामान्य नागरिकांच्या हक्कावर गदा आणणारा आहे....

विरोधी पक्षनेत्या सौ दिपाली प्रदीप धुमाळ 



प्रेस मीडिया ऑनलाइन : 

जीलानी (मुन्ना ) शेख :

 पुणे-महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेत्या सौ दिपाली प्रदीप धुमाळ यांनी आज महानगरपालिकेत भाजपा कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून दैनंदिन कामात अडथळे आणल्याचा ठपका ठेऊन हा गोंधळ सामान्य नागरिकांच्या हक्कावर गदा आणणारा अत्यंत वाईट प्रकार असल्याचे म्हटले आहे.त्या म्हणाल्या ,'पुणे महानगरपालिकेमध्ये सकाळी अकरा वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरक्षा विभागाने पोलिसांच्या सहकार्याने कडक बंदोबस्त ठेऊन सर्वसामान्य नागरिकांना पुणे महानगरपालिकेत प्रवेश दिला नाही….परंतु भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांबरोबर त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते मात्र मोठ्या संख्येने महानगरपालिके मध्ये फिरताना दिसत होते.


दुपारी चार ते साडेचार च्या दरम्यान भारतीय जनता पक्षाचे सर्व नगरसेवक एकत्र येऊन नवीन इमारतीतील जुन्या इमारतीमध्ये जात असताना नागरिक व विरोधी पक्षाचे सर्व नगरसेवक यांची देखील पोलिसांनी अडवणूक केली , त्यामुळे नागरिकांचा व विरोधी पक्षातील सर्व नगरसेवकांच्या महत्वाच्या कामांमध्ये अडथळा आणला गेला आहे.सर्व प्रकार महानगरपालिकेचे कर्मचारी, अधिकारी तसेच पत्रकार यांच्या देखतच घडत होता.टॅक्स भरणारे सर्वसामान्य पुणेकर नागरिक तसेच हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णांचे नातेवाईक शहरी गरीब योजनेसाठी महानगरपालिकेत पत्र घेण्यात येतात त्यांची देखील अडवणूक भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या पुणे महानगरपालिकेत आल्यामुळे त्यांच्या सत्काराचा अट्टहास करणा-या सत्ताधारी भाजपमुळे झाली. ही बाब अत्यंत निंदनिय व पुणे शहराच्या लौकिकास लाजविणारी आहे.असेही धुमाळ यांनी म्हटले आहे .

Post a Comment

Previous Post Next Post