प्रेस मीडिया लाईव्ह :
जिलानी ( मुन्ना )शेख
पुणे : शिवाजीनगर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने पक्ष सभासद नोंदणी अभियान राबविण्यात आले. या अभियानास मोठा प्रतिसाद मिळाला. तसेच या वेळी करोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मोफत युनिवर्सल पास देण्यात आले.राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, नगरसेवक महेंद्र पठारे, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष उदय महाले, निलेश निकम, कार्याध्यक्ष राजू साने, दयानंद इरकल,प्रदेश प्रतिनिधी प्रदिप देशमुख, सांस्कृतिक विभागाचे राज्य अध्यक्ष बाबा पाटील,प्रदेश उपाध्यक्ष राकेशजी कामठे ,राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे, कार्याध्यक्ष मनोज पाचपुते, अजिंक्य पालकर, युवती शहराध्यक्ष सुषमा सातपुते, यावेळी उपस्थित होते.
महापालिकेच्या नवीन प्रभाग रचनेतील प्रभाग क्रमांक 16 ( फर्गुसन रस्ता- एरंडवणे) मधील नागरिकांसाठी माजी युवक शहराध्यक्ष महेश हांडे, शहर उपाध्यक्ष अनिल पायगुडे यांनी या उपक्रमाचे संयोजन केले होते. कार्यक्रमाचे आयोजन अविनाश भांड,ईश्वर देवकर,निशिकांत कांबळे,अभिषेक जाधव यांनी केले.