राष्ट्रवादीचे नेते आणि पालकमंत्री अजित पवार यांनी आता स्पष्ट करावी .
अशी मागणी आम आदमी पार्टीचे युवा नेते कृष्णा गायकवाड यांनी केली आहे.
प्रेस मीडिया लाईव्ह :
जिलानी (मुन्ना) शेख :
पुणे- चोरांना पकडण्यासाठी, खुन्यांना पकडण्यासाठी शहरभर लावलेले सीसी टीव्ही प्रत्यक्षात सामान्य नागरिकांनाच , दुचाकी स्वारांवरच जास्त लक्ष केंद्रित करत असून त्याद्वारे हेल्मेट सक्ती करून हेल्मेट च्या नावाने पुण्यात करोडो रुपयांची लुट केली जाते आहे , हेल्मेट बाबत ची आपली भूमिका राष्ट्रवादीचे नेते आणि पालकमंत्री अजित पवार यांनी आता स्पष्ट करावी अशी मागणी आम आदमी पार्टीचे युवा नेते कृष्णा गायकवाड यांनी केली आहे.
ते म्हणाले,'भाजपाचे राज्यात सरकार असताना राष्ट्रवादी चे अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला यांच्यासह सर्वांनी हेल्मेट सक्तीला केलेला विरोध , भाजपचे संदीप खर्डेकर, ग्राहक पेठेचे सुर्यकांत पाठक आणि शिवसेनेसह अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हेल्मेट विरोधी सुरु केलेली चळवळ 'नाटकी होती काय ?असा प्रश्न विचारला जाऊ शकेल अशी स्थिती आता निर्माण होऊ पाहते आहे. एकीकडे मेट्रो शहरात आणली जात असताना दुसरीकडे १ टक्का मुद्रांक अधिभार मेट्रो साठी दस्तनोंदणीवर तर लावणार आहेतच , पण गेली वर्षाहून अधिक काळ हेल्मेट च्या नावाखाली सीसी टीव्ही ला कार्यरत करून लाखो दुचाकी चालकांना एसएम एस पाठवून लोक अदालतीच्या नोटीसा पाठवून त्यांच्याकडून हजारो रुपयांची दंड वसुली करून सरकारने करोडो रुपये वसुलीचे तंत्र न्यायिक प्राधिकरण यात घेऊन जमा करण्याचे कारस्थान सुरु ठेवलेले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते ,राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री असलेले अजितदादा पवार यांनी आता तरी तातडीने यावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे .
हेल्मेट सक्ती राज्यात आहेच हे स्पष्ट असून त्यावर नागरिकांना सुट दिलेली नाही . मग आपले कार्यकर्ते जी आंदोलने भाजपा सेना युतीचे सरकार असताना करत होती ते सारे ढोंग होते काय ? असा सवाल देखील गायकवाड यांनी केला आहे .बी आरटी येणार म्हणून, सायकल मार्ग उभारीत , बीआरटीचा वापर जास्त लोकांनी करावा म्हणून बीआरटीला स्वतंत्र लेन देत अगदी एसटी आणि मोठी वाहने देखील त्यातून बाजूला करत पुण्यात खाजगी वाहन चालकांना रस्ते अरुंद करून त्यांची गळचेपी करण्याचे कारस्थान राबविले गेले आता मेट्रो येणार म्हणून देखील हे दंड वसुलीचे प्रकार राबवून लोकांना मेट्रो कडे कसे वळविता येईल याचे षड्यंत्र राबविले जाते आहे .
पुण्यात वाहन नाही तर नौकरी अगर कामधंदा करता येत नाही अशा स्थितीत चालविलेली हि पुणेकरांची लुट आणि ज्यांच्या पक्षांचे सरकार आहे आणि होते त्यांनी सुरु ठेवलेले हे प्रकार असल्याने आता त्यांच्या नेत्यांनाच आम आदमी पार्टीने जाहीर आव्हान केले आहे यावर आपली भूमिका स्पष्ट करा म्हणजे लोक हि आपली भूमिका मग मतदानातून व्यक्त करतील असे आम आदमी पार्टीच्या कृष्ण गायकवाड यांनी म्हटले आहे.