कोणत्या धर्माच्या व्यक्तीने कोणते कपडे घालायचे हे सरकार ठरवू शकत नाही.
प्रेस मीडिया ऑनलाइन :
जीलानी (मुन्ना) शेख :
पुणे : कर्नाटकातील भाजप सरकारने आपल्या राज्यातील शाळा व महाविद्यायलयामध्ये विद्यार्थीनींनी हिजाब (गुरखा) परिधान करू नये असा आदेश काढला. या आदेशाच्या निषेधार्थ आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली कोहिनूर चौक, एम.जी.रोड, कॅम्प येथे निदर्शने-आंदोलन करण्यात आले. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जातीय तेढ निर्माण करणाऱ्या कर्नाटकातील भाजप सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या.
या वेळी बोलताना शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ''कर्नाटकातील भाजप सरकारने शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी हिजाब घालू नये असा आदेश काढला तो संविधानाच्या विरोधात आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये सर्व जाती धर्मांना समान अधिकार दिलेला आहे. अल्पसंख्यांकांना सुध्दा त्यांनी आपल्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार दिलेला आहे. कोणत्या धर्माच्या व्यक्तीने कोणते कपडे घालायचे हे सरकार ठरवू शकत नाही. प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. भारतीय जनता पक्ष ५ राज्यात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेवून जाणून बुजून अशा प्रकारचे आदेश काढून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहे. काँग्रेस पक्ष हा धर्म निरपेक्ष पक्ष आहे. जर भारतीय जनता पक्ष सत्तेचा गैर वापर करून अशा प्रकारचे आदेश काढून संविधानाला धोका निर्माण करीत असेल तर काँग्रेस पक्ष संविधानाच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार. संविधानाला ठेच पोहचू देणार नाही. स्वातंत्र्याच्या लढाईल देशातील सर्व जाती जमातीचे नागरिक सहभागी झाले होते. भारत देश राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक आहे आणि त्याचे रक्षण प्रत्येक भारतीयाने केले पाहिजे. विविधता मध्ये एकता ही आपल्या देशाची परंपरा आहे. कर्नाटक सरकारने त्वरीत त्यांनी काढलेले आदेश मागे घ्यावा.''
निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसेपाटील, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, नगरसेवक अरविंद शिंदे यांचीही यावेळी भाषणे झाली. यावेळी मुस्लिम महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी गटनेते आबा बागुल, कमल व्यवहारे, शिवाजी केदारी, मुख्तार शेख, मंजूर शेख, रविंद्र धंगेकर, लता राजगुरू, अविनाश बागवे, अजित दरेकर, चाँदबी नदाफ, नीता रजपूत, संगीता तिवारी, पूजा आनंद, राजेंद्र शिरसाट, अरूण वाघमारे, नुरुद्दीन सोमजी, आस्मा शेख, रमेश सोनकांबळे, प्रदीप परदेशी, सुनिल घाडगे, प्रविण करपे, सुजित यादव, अनिल अहिर, अविनाश अडसूळ, देविदास मगर, हेमंत राजभोज, परवेज तांबोळी, हार्दिक परदेशी, बबलू कोळी, क्लेमंट लाजरस, रॉबर्ट डेविड, आयुब पठाण, सुनिल पंडित, अमित बांडे, प्रेरणा गायकवाड आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.