प्रेस मीडिया लाईव्ह
पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली शेख
क्रांतिपिता लहुजी राघोजी साळवे (१४ नोव्हेंबर १७९४ - १७ फेब्रुवारी १८८१) हे भारतीय क्रांतिकारक होते. ते लहुजी वस्ताद नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या ‘पेठ’ या गावातील एका मातंग कुटुंबात झाला. मातंग समाजात जन्माला आलेल्या लहूजींना युद्धकलेचे प्रशिक्षण त्यांच्या घरातील वीर पुरुषांकडून मिळाले होते. लहूजींच्या वडिलांचे नाव राघोजी साळवे व आईचे नाव विठाबाई होते. लहूजी साळवे यांचे वडील राघोजी साळवे अतिशय पराकर्मी पुरुष होते, युद्ध कलेमध्ये त्यांचा कोणीही हात धरत नसे.
_आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे राष्ट्रीय स्मारक समिती संस्थेचे पदाधिकारी व बहुजन समाज पार्टीचे पिंपरी चिंचवड महिला नेते मा. विद्याताई जाधव ,युवा नेते मा. विकी भाऊ पासोटे , मा.संध्याताई गायकवाड , मा.आशाताई उभे , मा.हितेश लोखंडे मा.राणीताई साठे आदी पदाधिकारी उपस्थित होते....._
_या वेळेस बहुजन समाज पार्टीचे युवा नेते मा. विकी भाऊ पासोटे यांनी क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे विषयी बोलताना असे वक्तव्य केले की आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे जे स्मारक आहे ते अजुन पडद्यामागे आहे ते पडद्यासमोर आणण्यासाठी राज्य सरकारने याकडे लक्ष द्यावे लहुजी वस्ताद हे आमचे प्रेरणास्थान आहे त्यामुळे संगमवाडी येथे आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक आंतरराष्ट्रीय स्मारक झालीच पाहिजे अशी मागणी बहुजन समाज पार्टी च्या वतीने करण्यात आली...._