२४ आणि २५ फेब्रुवारी रोजी सुनावणी घेण्यात येणार
प्रेस मीडिया लाईव्ह. कॉम
जिलानी ( मुन्ना ) शेख :
पुणे महापालिकेच्या प्रारुप प्रभाग रचनेवर मागविण्यात आलेल्या हरकती आणि सूचनांवर २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे.शिवाजीनगर येथील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये सकाळी १० ते ६ या वेळेत होणार्या या सुनावणीसाठी प्रभागनिहाय वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसारच संबधितांनी सुनावणीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केले आहे.
महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी त्रिसदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली आहे. पुणे महापालिकेत नगरसेवकांची संख्या १७३ राहाणार असून ५७ प्रभाग हे त्रिसदस्यीय तर एक प्रभाग द्विसदस्यीय असेल. राज्य निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार तयार करण्यात आलेल्या प्रारुप प्रभाग रचनेवर १ ते १४ फेब्रुवारी दरम्यान हरकती मागविण्यात आल्या आहेत. शहरातून तब्बल साडेतीन हजारांहून अधिक हरकती आल्या असून वानवडी - रामटेकडी क्षेत्रिय कार्यालयातून सर्वाधीक तर शिवाजीनगर- घोलेरोड क्षेत्रिय कार्यालयातून सर्वात कमी हरकती आल्या आहेत. यशदाचे संचालक एम.चोकलिंगम यांची प्राधीकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून येत्या २४ आणि २५ फेब्रुवारीला त्यांच्या नेतृत्वाखाली ही सुनावणी होणार आहे.
प्रभागनिहाय हरकती व सूचनांवर सुनावणीचे वेळापत्रक पुढील प्रमाणे :
२४ फेब्रुवारी
प्र.क्र. १ ते ९ - सकाळी १० ते ११.३०.
१० ते १६ - सकाळी ११.३० ते दुपारी १.
१७ ते २० आणि ३०,३१,३३,३५ - दुपारी २ ते ४.
२७ ते २९ - दुपारी ४ ते ६.
२५ फेब्रुवारी
प्र.क्र. २१,२२,२३,२५,२६, ४१ ते ४६ - सकाळी १० ते ११.३०
३७ ते ४० - सकाळी ११.३० ते १.
४७ ते ५० आणि ५७ - दुपारी २.३० ते ३.३०.
५१,५३ ते ५६ - दुपारी ४.३० ते ६.