वाहतूक ॲप कंपनी धारकांनी बेकायदा दुचाकी टॅक्सी वाहतूक चालू केली त्या कंपनी वर कारवाई करताना सरकारी यंत्रणा मूग गिळून गप्प का..?
प्रेस मीडिया ऑनलाईन
पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली शेख :
पुणे शहरात विना परवाना बेकायदा दुचाकी टॅक्सी वाहतूक करणाऱ्या कंपनी ॲप ला राज्य सरकार की परिवहन मंत्रालय कौन अभय देतोय ? असं दृश्य निर्माण झालं आहे रिक्षचालकांच्या समोर ४ फेब्रुवारी रोजी, हजारो रिक्षा चालकांच्या उपस्थित, डॉ. केशव नाना क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली, बघतोय रिक्षावाला ने सरकारला शेवटची वॉर्निंग / अंतिम इशारा दिला होता की, १० फेब्रुवारीपर्यंत बेकायदा बाईक टॅक्सी बंद झाली नाही, तर बेमुदत आंदोलन चालू करू. ठरल्याप्रमाणे आज १० फेब्रुवारी पासून हजारो रिक्षाचालक पुणे आरटीओ येथे बेमुदत आंदोलनास बसणार आहेत.
सदर आंदोलनामध्ये अंदाजे १० हजार रिक्षाचालक सहभाग घेत असून, हे आंदोलन फक्त आणि फक्त बघतोय रिक्षावालाच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेले आहे.काही संघटना बघतोय रिक्षावाला फोरम त्यांच्याबरोबर आंदोलन करत असल्याचे गैरसमज पसरवत असून बघतोय रिक्षावाला फोरम कोणत्याही कृती समितीमध्ये सामिल नाही, हे जाहीर करत आहे. स्वतः सरकार आणि प्रशासन यांनी बाईक टॅक्सी बेकायदा आहे हे प्रेस नोट देऊन मान्य केलेले असून सुद्धा प्रत्यक्षात प्रशासन ओला/ उबेर / रॅपीडो सारख्या कॅब ऍग्रीगेटर कंपन्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यास धजावत नाही.ते फक्त जे युवक बाईक टॅक्सी व्यवसाय करत आहेत, त्यांनाच वेठीस धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करत आहेत.परंतु ज्या मोठमोठ्या कंपन्या या युवकांना फसवून, या बेकायदा व्यवसायामध्ये आणत आहेत, त्यांच्यावर आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई प्रशासनाने केलेली नसून, त्यांच्यावर साधा एक रुपयाचा दंड सुद्धा लावलेला नाही.परंतु बेकायदा बाईक टॅक्सी चालवणाऱ्या गरीब युवकांना हजारो रुपये दंड हे सरकार आणि प्रशासन लावत आहे.
' बघतोय रिक्षावाला ' फोरमचा सरळ आरोप आहे की, हे सरकार आणि प्रशासन या बेकायदा बाईक टॅक्सी चालवणाऱ्या कंपन्यांबरोबर सामील असून, गोरगरीब रिक्षाचालक आणि बेकायदा बाईक टॅक्सीच्या जाहिरातींना बळी पडणाऱ्या युवकांच्या आयुष्याशी खेळत आहे.
या बाबत उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांनी ४ जानेवारी रोजी, आठ दिवसात बाईक टॅक्सी बंद करण्याचे आश्वासन दिले होते. आता जवळपास सव्वा महिना उलटून गेला तरीही बाईक टॅक्सी सर्रास चालू आहे, याचा निषेध म्हणून बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात आंदोलन १० फेब्रुवारी रोजी, सकाळी ११ वाजल्यापासून बेमुदत आरटीओ ऑफिस पुणे येथे चालू होत आहे.