कर्नाटक सरकारच्या शाळांमध्ये हिजाब बंदी कायद्या विरोधात

  पिंपरी चिंचवड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मुस्लिम समाजाचा निषेध आंदोलन..


प्रेस मीडिया ऑनलाईन : 

पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली शेख :

पिंपरी चिंचवड दि ११  फेब्रुवारी कर्नाटक  सरकारने राज्यातील शाळांमध्ये मुस्लिम समाजाच्या विद्यार्थिनींना  हिजाब बंदी केली त्या विरोधात  पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर   निषेध आंदोलन करण्यात आले. 


संविधानाने दिलेला हा आमचा अधिकार आहे आणि तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया पिंपरी शहरातील मुस्लिम समाजाने दिली आहे. हा आंदोलन ऊलमा ए कौन्सिल पिंपरी चिंचवड आणि पिंपरी शहर जुलूस कमिटी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

त्यावेळी अजीज शेख आरपीआय आठवले, बाळासाहेब भागवत आरपीआय आठवले, हाजी गुलाम रसूल साहेब भी तसेच मौलाना  फेज अहमद साहेब, मौलाना नुरी नय्यर  साहेब , मौलाना हाजी हसिबुल्लाह साहेब, मौलाना तनवीर साहेब, ऊलमा कौन्सिल , व पिंपरी चिंचवड शहर जुलूस कमिटी अध्यक्ष हाजी नियाज सिद्दीकी, उपाध्यक्ष युसुफ कुरेशी, शहाबुद्दीन शेख, जावेद मिया खान ,नासिर शेख आदी प्रमुख मान्यवर व जनसमुदाय उपस्थित होते.


प्रेस मीडिया लाईव्ह :

 पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली शेख 

Post a Comment

Previous Post Next Post