हाय प्रोफाईल महिलांशी संबंध जुळवून देतो, असं सांगून कथित लेखकाने अनेकांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस

 सायबर सेलच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटक्के यांच्या नेतृत्वात पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या .


प्रेस मीडिया लाईव्ह : 

जिलानी ( मुन्ना ) शेख :

पुणे : ‘फ्रेण्डशीप क्लब’च्या नावाखाली हाय प्रोफाईल महिलांशी शरीर संबंध जुळवून देतो, अशा बाता मारुन अनेकांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.पुण्यात 76 वर्षीय बिझनेसमनला 60 लाखांचा चुना  लावल्यानंतर भामटा अखेर पोलिसांच्या जाळ्यात आला आहे. गुन्हे करुन त्याचा उपयोग कथा लेखनासाठी करण्याचा प्रकार पुणे सायबर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. आरोपीचं नाव अनुप मनोरे असं आहे. मात्र गणेश शेलार हे खोटं नाव धारण करुन तो अनेकांना लुबाडत असल्याचं समोर आलं आहे. फ्रेंडशिप क्लबच्या नावाखाली वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन तो लोकांना जाळ्यात ओढत असल्याची माहिती आहे. सायबर सेलच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटक्के यांच्या नेतृत्वात पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

काय आहे प्रकरण...?

हाय प्रोफाईल महिलांशी संबंध जुळवून देतो, असं सांगून कथित लेखकाने अनेकांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या लेखकाने केलेले गुन्हेही साधेसुधे नाहीत. गेल्या दहा वर्षांपासून तो हाय प्रोफाइल महिलांशी नातं जोडून देतो, असं सांगत बड्या बड्यांना फसवत असल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील एका 76 वर्षांच्या व्यवसायिकाला तब्बल साठ लाखांचा गंडा त्याने घातला. त्यानंतर सायबर पोलिसांनी या कथित लेखकाला अटक केली आहे.

हाय प्रोफाइल महिलांशी शरीर संबंध

अनुप मनोरे असं या आरोपीचं नाव आहे. गेल्या दहा वर्षांपासून तो हाय प्रोफाइल महिलांशी शरीर संबंध प्रस्थापित करून देतो असं सांगत तो हजारो लोकांना फसवत आला आहे. त्यासाठी त्याने गणेश शेलार हे खोटं नाव धारण केलं होतं.

एंजॉय करा आणि हजारो रुपये कमवा, मीनाक्षी फ्रेंडशिप क्लब, रोड टू हेवन अशा शीर्षकांसह अनुप वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देत असे आणि बडे मासे आपल्या जाळ्यात ओढत असे. या संदर्भात सायबर सेलच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटक्के यांनी माहिती दिली.

Post a Comment

Previous Post Next Post