पुण्यात धक्कादायक प्रकार एका व्यक्तीने फेसबूक लाईव्ह करत हॉटेल्सच्या १३ व्या मजल्यावरुन घेतली उडी



प्रेस मीडिया ऑनलाईन :

 पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली शेख :

पुणे शहरात घडला  एक धक्कादायक प्रकार. एका व्यक्तीने फेसबूक लाईव्ह करत हॉटेल्सच्या क्या १३ व्या मजल्यावरुन उडी घेतली असल्याची माहिती समोर आली आहे.


एक धक्कादायक मनाला सुन्न करणारी घटना घडली एका प्रसिद्ध हॉटेलमधील वेटरने फेसबूक लाईव्ह करत इमारतीच्या १३ व्या मजल्यावरुन उडी घेतल्याची घटना समोर आली आहे.  रेस्टॉरंट इमारतीच्या १३ व्या मजल्यावरुन उडी घेत वेटरने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मृतक वेटरचं नाव अरविंद सिंह राठौर असे असून तो २६ वर्षांचा होता. 

 या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद सिंह राठौर हा मूळचा उत्तराखंडचा रहिवासी होता. मुंढवा परिसरातील हॉटेल पेंट हाऊस मध्ये तो एक महिन्यापूर्वीच कामाला लागला होता. घटनेपूर्वी अरविंद याने फेसबूक लाईव्ह करत हॉटेलमधील काही लोकांनी मला फसवल आहे असा आरोप त्याने केला केला व त्यामुळेच आत्महत्या करण्याचा निर्णय घेतलाच सांगितले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. ही घटना बुधवारी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

 पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली शेख 

Post a Comment

Previous Post Next Post