पुण्यातील ओशो आश्रमातील संन्यासिनीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस

पोलिसांनी विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास केला जात आहे.

प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे : जिलानी ( मुन्ना ) शेख : 

पुणे  : पुण्यातील  ओशो आश्रम हे देशभरातील प्रसिद्ध आश्रम आहे. देशातील विविध ठिकाणाहून अनेक संन्याशी याठिकाणी ध्यानसाधना करण्यासाठी येत असतात.असं असताना आश्रमातील एका 81 वर्षीय साधकाने 53 वर्षीय संन्यासिनीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेनं कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 53 वर्षीय पीडित महिला पुणे शहरातील बाणेर परिसरातील रहिवासी आहे.




गेल्या पंचवीश वर्षाहून अधिक काळापासून ही महिला ओशोच्या आश्रमात नियममितपणे ध्यानसाधना करण्यासाठी येत आहे. 1996 पासून त्या ओशो आश्रमाशी जोडलेल्या आहेत. घटनेच्या दिवशी 12 फेब्रुवारी रोजी त्या नेहमीप्रमाणे आश्रमात ध्यानसाधना करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी येथील एका 81 वर्षीय साधकाने त्यांचा विनयभंग केला आहे.

 मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास फिर्यादी सत्संग कार्यक्रमासाठी जात होत्या. यावेळी आरोपी साधक योग प्रताप यांनी फिर्यादीला हातवारे करत आपल्याजवळ बोलावून घेतलं. यानंतर आरोपीनं फिर्यादीला त्यांच्या गळ्यातील ओशो यांचा फोटो असलेली संन्याशी माळ काढून टाकण्यास सांगितली. त्यानंतर 'गेट आऊट' असं मोठ्याने ओरडत त्यांचा विनयभंग केला आहे.

ही घटना घडल्यानंतर पीडित महिलेनं कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली आहे. 81 वर्षीय आरोपी योग प्रताप उर्फ लाल प्रताप हा ओशो आश्रमाच्या विश्वस्तांपैकी एक आहे. कोरेगाव पार्क पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक इंगोले तपास करीत आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post