येथील परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर
प्रेस मीडिया लाईव्ह.कॉम :
जिलानी ( मुन्ना ) शेख :
पुणे - सारगबाग येथे उभारण्यात आलेल्या सणस क्रीडांगण येथील इमारतीत ठिकठिकाणी दारुच्या बाटल्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे येथील परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पुणे महापालिकेच्या वतीने सारसबाग जवळ बाबुराव सणस क्रीडांगण येथे क्रीडा संग्रहालय उभारले जात आहे. क्रीडा संस्कृती रुजावी आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळावी या उद्देशाने हे संग्रहालय उभे केले जात आहे. मात्र, काम अद्यापही अर्धवट अवस्थेत आहे. या संग्रहालयातील पहिल्या मजल्यावर प्रवेश करताना डाव्या बाजूला असलेल्या हॉलमध्ये दारूच्या बाटल्या आढळल्या आहेत.
या क्रीडा संग्रहालयासाठी कोणतीही सुरक्षा नाही. तेथील दरवाजांना कुलूप सुद्धा नसल्याने येथे सर्रास पार्ट्या होतात. तसेच, संग्रहालयाच्या कामासाठी घेण्यात आलेला विजजोड अतिशय धोकादायक असून, शॉर्टसर्किट होऊन क्षणार्धात केलेल्या कामाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतो. त्यामुळे एकूणच येथील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.