प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : जिलानी उर्फ मुन्ना शेख :
पुणे : रश्मी शुक्ला यांनी पुण्यातील राज्य गुप्त वार्ता विभागामध्ये आयुक्तपदाच्या कार्यकाळा मध्ये पदाचा गैर वापर करून 'फोन टॅपिंग' केले.ज्या व्यक्तींच्या 'फोन टॅपिंग'ची अनुमती घेतली होती, त्या नावां मध्ये बदल केले. त्यामध्ये त्यांचा सहभाग असल्याचे तांत्रिक अन्वेषणामध्ये निष्पन्न झाले आहे, असा अहवाल तत्कालिन पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने सादर केला आहे. सदर अहवाला नुसार पुण्याच्या तत्कालिन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वर्ष २०१५ ते २०१९ या कालावधी रश्मी शुक्ला यांनी राजकीय नेत्यांचे 'फोन टॅपिंग' करून त्यातील संभाषण भाजप-सेना सरकारमधील वरिष्ठ नेत्यांना पुरवल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या बाबत वर्ष २०२१ च्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशना मध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.