प्रेस मीडिया लाईव्ह :
जिलानी उर्फ मुन्ना शेख :
पुणे : भाजपच्या वतीने पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका लढविल्या जातील अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच केली.
पुणे भाजप शहर कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकार्यांच्या बैठकीत चंद्रकांत पाटील बोलत होते. महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांची उपस्थिती होती.
या वेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की , आगामी निवडणुकीसाठी शहर भाजपची तयारी अंतिम टप्प्यात आहे. बूथस्तरापर्यंतच्या रचना पूर्ण झाल्या आहेत. शहर, विधानसभा आणि प्रभागनिहाय निवडणुक व्यवस्थापन समितीची लवकरच रचना पूर्ण करण्यात येईल. जगदीश मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महानगरपालिकेत शंभरहून अधिक नगरसेवक निवडून येतील असा ठाम विश्वास असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले..
Tags
पुणे शहर