पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचा काँग्रेस कडून निषेध करण्यात आला.
प्रेस मीडिया लाईव्ह :
जीलानी ( मुन्ना ) शेख :
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाने कोरोना देशात पसरविला असे खोटे बोलून महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्यांच्या या खोट्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गिरीष बापट यांचे निवासस्थाना जवळ ओंकारेश्वर घाटाजवळ, येथे "माफी मागो" आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध काँग्रेस कडून करण्यात आला.
हे आंदोलन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.या आंदोलनाला पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा पुजा आनंद, माजी महापौर कमल व्यवहारे, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, पुणे शहर काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष मोहन जोशी,संजय बालगुडे,काँग्रेसचे पुणे महानगरपालिकेतील नगरसेवक ,पुणे शहरातील काँग्रेसचे पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.रमेश बागवे म्हणाले,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाने कोरोना देशात पसरविला असे खोटे बोलून महाराष्ट्राचा अपमान केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली पाहिजे.
आमच्या महाविकास आघाडी सरकार मधील काँग्रेसच्या मंत्र्यांनी कोरोना व्यवस्थित हाताळला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. असे पंतप्रधानांचे वक्तव्य काँग्रेस खपवुन घेणार नाही. जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी माफी मागत नाहीत. तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचे कारण म्हणजे, खासदार गिरीश बापट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माफी मागण्यास सांगायला पाहिजे. असे रमेश बागवे म्हणाले.
मोहन जोशी म्हणाले, येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत कोण बाजी मारते हे कळेलच.पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाने कोरोना देशात पसरविला असे खोटे बोलून महाराष्ट्राचा अपमान केला आहे. शिवाजी महाराजांबद्दल घाणेरडे वक्तव्य केले आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली पाहिजे. म्हणून आज आम्ही आंदोलन करत आहोत. असे मोहन जोशी म्हणाले