अन्यथा हा पूल परस्पर वाहतुकीसाठी खुला केला जाईल...
माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचा इशारा
प्रेस मीडिया ऑनलाइन :
जिलानी ( मुन्ना ) शेख :
पुणे -सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गाडीतळ येथे उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. पुलाची बेरींग खराब झाल्याने दुरुस्तीसाठी बंद आहे .मात्र,प्रशासनाने कोणतेही पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले नाहीत. यामुळे वाहतूक कोंडीने वाहनचालक बेजार झाले आहेत.पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने उभारला असला तरी त्याची देखभाल दुरुस्ती ही महानगरपालिकेची आहे . मात्र, महानगरपालिका अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून पुलाचे दुरुस्तीचे काम त्वरीत पूर्ण करावे, अन्यथा हा पूल परस्पर वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असा इशारा माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी दिला आहे.
हडपसर उड्डाणपुल त्वरीत दुरूस्त करून, किमान दुचाकी व हलक्या वाहनानां वाहतुकीस खुला करावा व नागरीकांची वाहतुक कोडींतून सुटका करावी, यासाठी हडपसर विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने उड्डाणपूलावर आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनाच्या गलथान कारभाराचा निषेध करण्यात आला.
माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर व हडपसर विधानसभा काँग्रेस अध्यक्ष प्रशांतमामा तुपे याच्यां नेतृत्वाखाली आज ठिय्या आंदोलन करण्यात आले. पुढील दोन दिवसात दुचाकी व हलक्या वाहनांना पूल चालू झाला नाही, तर हडपसरचे काँग्रेस कार्यकर्ते बुधवारी सकाळी 9 वाजता हा उड्डानपूल वाहतूकीस खुला करतील,असा इशारा यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणिस अभिजित शिवरकर, विजय जाधव, शहाजी मगर ,माऊली तुपे, बाळासाहेब गोधळे, अमित घुले, दिलिप तुपे, गणेश फुलारे, सुभाष बोराटे, दिपक भडके, बाळासाहेब हिगणे, रूतुराज कोढरे, नितीन आरू, सुभाष सरोदे, आल्ताफ शेख, गणेश कवडे, दादा मगर, इदिराताई तुपे, अजय खामकर, स्वप्निल डांगमाळी, वैभव डांगमाळी, प्रशांत जाधव, शुभम कवडे, मनोज शिवरकर, जानमोहम्मद शेख, महेंद्र तडके,दाजी जाधव, उदय लोणकर, आबा चव्हाण, प्रमोद काटकर, चंद्रकांत भंडारी याच्यांसह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.